वडीलांच्या स्मरणार्थ पंडीत भावंडांनी हनुमान मंदिरासाठी बांधले सभागृह
प्रल्हाद हिवरराळे
उमरी :- आपण समाजामध्ये वावरत असताना सामाजिक बांधिलकी जोपासता आपण काही देण लागतो याभावनेतून वडिलांच्या पित्यर्थ मुलगा चक्क बारा लाख रुपये खर्चून उमरी भोकर रस्त्यावरील हनुमान मंदिर परिसरात मोठे सभागृह बांधकाम करून दिल्याने उमरी शहरात अनेकांना आदर्शाचा पायडा घालून दिल्यासारखे वावग ठरेल असे समाजभूषण विष्णु पंडीत, व राजू पंडीत यांनी उपस्थितांच्या धक्का दिला.
आदर्श शिक्षक ते मुख्याध्यापक पद भूषविलेले स्वर्गीय नंदकिशोर मुरलीधर पंडित गुरूजी यांच्या स्मृती प्रित्यर्थ हनुमान गड येथील हनुमान मंदिरात लोकांना पावसामध्ये भंडारा करण्यामध्ये मोठी अडचणी येत होती त्या अडचणीची दखल समाजभूषण राजू पंडीत व विष्णू पंडीत हे दोघे सख्खे बंधु घेऊन त्यांनी पुजारीसाठी एक रूम व भक्तासाठी जेवण्यासाठी हॉल व बाहेर स्वयंपाक करण्यासाठी शेड तयार करून ता.३ ऑगस्ट रोजी शेतीनिष्ठ शेतकरी सुभाषराव देशमुख गोरठेकर, विष्णू अट्टल, पारस दर्डा यांच्या प्रमुख उपस्थित मंदिराचे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर अग्रवाल यांना एक चाबी, आणी पुजारी यांना एक चावी त्यांच्या स्वाधीन करण्यात आली. यावेळी हे सत्कार्य केल्या बद्दल सुभाषराव देशमुख गोरठेकर, हैदराबाद डिव्हिजनचे रेल्वे डी आर युसीसी मेंबर पारसमल दर्डा यांनी राजेश नंदकिशोर जी पंडित व विष्णू नंदकिशोर जी पंडित या दोन्ही भावांना समाज भूषण संबोधन करुन त्यांचा शाल व श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला.
याप्रसंगी सुभाषराव देशमुख गोरठेकर, विष्णू अट्टल, दामोदर पंडित, महावीर दर्डा, माधवराव पाटील बोडके, शंकर गोक्कवार, नागेश गोणेवार, गोपाळ राठोड, विठ्ठलराव वाघमारे गुरूजी, नंदकुमार कुलकर्णी, राजेश पाटील, गणेश यम्मेवार, दिलीप राठोड, गजू अलसाटवार, पोलीस पाटील दताञय वारेवार, बालाजी धोतरे, नरेंद्र दर्डा, प्रल्हाद हिवराळे, दिलिप पाटील, श्रीनिवास अनंतवार, सुर्यकांत पाटील येताळे,कैलास आडे, समर्थ माहुरकर, आधी भक्तगण उपस्थित होते