समाजवादी पक्षाच्या युवा जिल्हाध्यक्षपदी विठ्ठल पा.गवळी
आरिफ शेख
नायगाव : नायगाव तालुक्यातील युवा कार्यकर्ते तथा सामाजिक उपक्रमा हरहुन्नरीने सहभागी होऊन समाजकार्य करणारे धडाडीचे कार्यकर्ते विठ्ठल पाटील गवळी यांची समाजवादी पक्षाच्या नांदेड जिल्ह्याच्या युवा जिल्हाध्यक्षपदी नुकतीच निवड करण्यात आली. सदर निवडीचे प्रदेशाध्यक्ष अबू आसीम आझमी यांच्या हस्ते नियुक्ति पत्र देऊन पुढील कार्यास शुभेच्छा देण्यात आल्या.
सामाजिक कार्यकर्ते विठ्ठल पाटील गवळी हे नेहमीच सामाजिक कार्यात अग्रेसर असतात यामुळे त्यांच्या कार्याची दखल घेऊन प्रदेशाध्यक्ष अबू आसीम आझमी यांनी गवळी यांची समाजवादी पक्षाच्या नांदेड जिल्ह्याच्या युवा जिल्हाध्यक्षपदी निवड केली.
व युवा प्रदेशाध्यक्ष फहात अहमद, माजी तालुकाध्यक्ष शफीखान पठाण, माजी युवा तालुकाध्यक्ष आजम शेख यांच्या उपस्थित निवडीचे नियुक्ति पत्र देऊन पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या तसेच विठ्ठल पाटील गवळी यांची युवा जिल्हाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल त्यांचे नरसी येथे छोटेखानी सत्काराचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी मित्रमंडळाच्यावतीने गवळी यांचे सत्कार करून भरभरून शुभेच्छा दिल्या यावेळी जेष्ठ मार्गदर्शक करामतुला खान, माजी तालुकाध्यक्ष शफीखान पठाण, माजी युवा तालुकाध्यक्ष आजम शेख, आंनद पाटील जाधव, शेख फयूम, अनिल कांबळे, पाशाभाई शेख यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते तसेच युवा जिल्हाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल विठ्ठल पाटील गवळी यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत असून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.