जनतेच्या आग्रहास्तव नायगाव विधानसभा निवडणूक लढविणार – डॉ.मिनल पाटील
मोरे मनोहर
किनाळा :- भारतीय जनता पक्षाने डॉ. मीनल पाटील खतगावकर यांना विधान परिषदेवर घेण्याचे आश्वासन देऊन त्यांना विधानसभेवर संधी न दिल्याने नायगाव विधानसभा मतदारसंघातून डॉ. मीनल पाटील खतगावकर ह्या अपक्ष निवडणूक लढवावे असा आग्रह सामान्य कार्यकर्ते व मतदारातून करण्यात येत असल्याने त्यांच्या आग्रहास्तव ही विधानसभा निवडणूक लढविणार असल्याचे खतगावकर कुटुंबीयांचे कुलदैवत आणि तीन नद्यांचा संगम असलेल्य संगमेश्वर मंदिरात श्रावण सोमवार निमित्त महाप्रसादाच्या आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात डॉ.मिनलताई पाटील खतगावकर यांनी घोषित करून प्रचाराचा शुभारंभ केला असल्याने नायगाव विधानसभा मतदारसंघातील इच्छुक असलेल्या अनेक उमेदवारांसमोर मोठे आव्हान उभा राहिले आहे.
भास्कररावजी पाटील खतगावकर यांनी सन 2014 मध्ये बिनशर्त भारतीय जनता पक्षात प्रवेश करुन अत्यंत विस्कळीत झालेल्या भाजपला मोठ्याप्रमाणात उभारी दिली अनेक दिग्गज नेत्यांना भाजपात आणले त्यामुळे लोकसभा निवडणूकीत नांदेडमधून कॉंग्रेस पराभूत झाली पण खतगावकरांनी भाजपा वाढवण्यास नांदेड जिल्हयात जेवढी मेहनत केली त्या तुलनेत भाजपाने त्यांना राजकीय शक्ती दिली नाही.
सन 2019 च्या विधानसभा निवडणूकीत नायगाव विधानसभा मतदारसंघातून डॉ. मीनल पाटील खतगावकर यांना उमेदवारी देण्यासंबंधी भाजपाने समर्थतता दर्शविली होती त्याअनुषंगाने डॉ. मीनल पाटील यांनी दोन वर्षापुर्वीपासून कार्यकर्त्याचा मोठा संच तयार करुन संपुर्ण विधानसभा मतदारसंघ पिंजुन काढला होता नायगाव, धर्माबाद, उमरी या तीन्ही तालूक्यातून डॉ. मीनल पाटील यांच्याबद्दल लोकमतातून सहानुभूती निर्माण झाली होती पण भाजप नेतृत्वाने पुन्हा ऐनवेळी सन 2014 च्या निवडणूकीत पराभुत झालेले राजेश पवार यांनाच उमेदवारी दिली आणि डॉ. मीनल पाटील खतगावकर यांच्यावर पक्षाकडून अन्याय झाला.
दरम्यानच्या कोवीड काळात देगलूर विधानसभेचे विद्यमान आमदार रावसाहेब अंतापुरकर यांचे निधन झाले आणि या पोटनिवडणूकीत स्व. रावसाहेब अंतापुरकर यांचे चिरंजीव जितेश अंतापुरकर यांना निवडून आणायचे असेल तर भास्करराव पाटील खतगावकर यांच्याशिवाय पर्याय नाही म्हणुन काँग्रेस नेतृत्वाने खतगावकरांना कॉंग्रेसमध्ये येण्याची ऑफर दिली आणि कॉंग्रेसमध्ये प्रवेश करुन घेतला आणि जितेश अंतापुरकरांना खतगावकर यांनी मोठ्यामताधिक्याने निवडूनही आणले.
राज्याच्या विकासासाठी सन 2024 च्या लोकसभा निवडणुकीपुर्वी स्वतः अशोकराव चव्हाण यांनी भाजपामध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आणि त्याचदिवशी भास्करराव पाटील खतगावकर यांनी देखील नांदेड जिल्हयाच्या विकासासाठी अशोकरावांना सहकार्य करणार असल्याचे पत्रकार परिषद घेवुन जाहीर केले होते. अशोकरावांच्या भाजपा प्रवेशाला सर्वप्रथम भास्करराव पाटील खतगावकरांसह माजी आ. ओमप्रकाश पोकर्णा व माजी आ. अविनाश घाटे यांना देखील या पत्रकार परिषदेला बोलावुन या तिघांनी अशोकरावांच्या नेतृत्वाखाली भाजपात काम करण्याचे मान्य केले.
लोकसभा निवडणूक डॉ. मीनल पाटील खतगावकर या काँग्रेस पक्षाकडून लढवण्याची तयारी यापुर्वीच केली होती त्यास अशोकराव चव्हाण यांनीही दुजोरा दिला होता त्यामुळे अशोकरावांच्या भाजपा प्रवेशामुळे डॉ.मीनल पाटील खतगावकर यांना भाजपा कडून लोकसभेचे उमेदवारी मिळेल असे वाटले होते मात्र भाजपाने त्यांना वेटींगवरच ठेवले व पुन्हा प्रतापराव चिखलीकरांना उमेदवारी दिल्या गेली त्यावेळी डॉ. मीनल पाटील खतगावकर यांना विधान परिषदेवर घेण्याचे आश्वासन भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांने दिले होते पण अद्यापही डॉ. मीनल पाटील खतगावकर यांच्यावर भाजपाकडून वेळोवेळी अन्यायच होत असल्याची भावना खतगावकर समर्थकांमध्ये व्यक्त होत आहे.
सन 2024 मध्ये लोकसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेस पक्षाकडून डॉ. मीनल पाटील खतगावकर या शंभर टक्के खासदार म्हणून एकमेव उमेदवार असताना भास्करराव पाटील खतगावकर यांनी राज्याच्या विकासासाठी अशोकराव चव्हाण यांच्या पाठिमागे आपली सर्व ताकद उभा करून भाजपाचे तन-मन-धनाने काम केले जर दादा भाजपात गेले नसते तर काँग्रेस पक्षाकडून नांदेड जिल्ह्याच्या खासदार म्हणून डॉ. मीनल पाटील खतगावकर ह्या राहिल्या असत्या असे अनेक मतदारसंघातील कार्यकर्त्यातून बोलले जात होते.
येणा-या विधानसभा निवडणूकीत डॉ. मीनल पाटील खतगावकर यांनी नायगाव विधानसभा मतदारसंघातून अपक्ष निवडणूक लढवावी अशी आग्रही मागणी खतगावकर समर्थक कार्यकर्त्यानी भास्कररावजी पाटील खतागवकर यांच्याकडे केली असता भास्करराव पाटील खतगावकर यांनी आपले मनोगत व्यक्त करताना मिनल विधानसभेवर जाण्यासाठी कार्यकर्त्यातून आग्रह असेल तर कार्यकर्ते व मीनल यांच्यामध्ये मी अडथळा राहणार नाही त्यांना माझे पूर्ण सहमती असल्याचे घोषित केल्याने कार्यकर्त्यात नवचैतन्य निर्माण झाले.
यावेळी नायगाव बिलोली उमरी धर्माबाद तालुक्यातील कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते या कार्यक्रमास संगमेश्वर मंदिराच्या ट्रस्टचे अध्यक्ष तथा माझी खासदार भास्करराव पाटील खतगावकर, माजी आमदार अविनाशरावजी घाटे, डॉ.मिनलताई पाटील खतगावकर, बाळासाहेब पाटील खतगावकर, भास्कर पाटील भिलवंडे, आमदार जितेश अंतापुरकर यांच्या मातोश्री शितल अंतापुरकर. प्रा जिवन चव्हाण, माजी जिल्हा परिषद चे अध्यक्ष माधवराव मिसाळे, रवि पाटील खतगावकर, अंतापुरकर, सदाशिवराव पाटील, संतोष पाटील, प्राचार्य दुर्गा प्रसाद पांडेय आदिसह अनेक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या कार्यक्रमाच्या सुरुवातीस सुप्रसिद्ध कीर्तनकार मधुकर महाराज सायाळकर यांच्या कीर्तनाने उपस्थित भाविक मंत्रमुक्त झाले होते. यानंतर खतगावकर कुटुंबाचे कुलदैवत असलेल्या संगमेश्वर मूर्तीची खतगावकर कुटुंबीयांनी महापूजा केल्यानंतर महाप्रसाद देण्यात आले यावेळी हजारों भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
देवस्थानचे पुजारी पुंडलिक महाराज यांनी खतगावकर कुटुंबाच स्वागत करून डॉ.मिनल पाटील खतगावकर यांना भावी आमदार म्हणून आशीर्वाद दिले.