ताज्या बातम्यानांदेडनायगांव

मंगल कार्यालया समोरून दुचाकी लंपास ; अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल

New Bharat Times नेटवर्क

नायगाव :- नायगाव येथील अंबिका मंगल कार्यालयासमोर उभी केलेली एक दुचाकी अज्ञात चोरट्यांनी भरदिवसा चोरून नेल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी नायगाव पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फिर्यादी मोहन बापूराव पवार (वय ३० वर्ष, रा. होटाळा, ता. नायगाव) हे ३१ मार्च २०२६ रोजी एका कार्यक्रमासाठी आपली काळ्या रंगाची पॅशन प्रो दुचाकी (क्रमांक MH-26-AN-9599) घेऊन नायगाव येथील अंबिका मंगल कार्यालयात आले होते. दुपारी १२:३० वाजेच्या सुमारास त्यांनी आपली दुचाकी कार्यालयाच्या समोर लावून ते आत गेले होते.

​दुपारी ३:३० वाजेच्या सुमारास कार्यक्रम संपवून बाहेर आले असता, त्यांना आपली दुचाकी लावलेल्या ठिकाणी दिसून आली नाही. परिसरात सर्वत्र शोध घेऊनही दुचाकी मिळून आली नाही, त्यामुळे आपली दुचाकी चोरीला गेल्याची खात्री पटल्यानंतर पवार यांनी नायगाव पोलीस ठाण्यात तक्रार दिली.

या तक्रारीवरून नायगाव पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता २०२३ च्या कलम ३०३(२) नुसार गुन्हा रजिस्टर क्रमांक ७८/२०२६ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. चोरीला गेलेल्या दुचाकीची किंमत साधारण २०,००० रुपये असल्याचे सांगण्यात आले आहे.

​या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक सुभाषचंद्र नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली हेड कॉन्स्टेबल राजेंद्र चंडू वाघमारे हे करत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker