गावाकडच्या बातम्यानांदेडबिलोली

अप्पर पोलीस अधीक्षक अर्चना पाटील यांची कुंडलवाडी पोलीस ठाण्यास भेट

कुंडलवाडी :- भोकर विभागाच्या अप्पर पोलीस अधीक्षक अर्चना पाटील यांनी दि.३१ जुलै रोजी सकाळी ११ वाजता कुंडलवाडी पोलीस ठाण्यास भेट देऊन कुंडलवाडी पोलीस ठाणे व परिसराची पाहणी केली.यावेळी कुंडलवाडी पोलीस ठाण्यातर्फे अप्पर पोलीस अधीक्षक अर्चना पाटील यांचा शाल, श्रीफळ व पुष्पहार देऊन सत्कार करण्यात आला.

यावेळी कुंढलवाडी पोलीस ठाण्यातील अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या अडचणी व समस्या अपर पोलीस अधीक्षक अर्चना पाटील यांनी जाणून घेतल्या. यावेळी सहायक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर शिंदे यांच्यासह पोलिस ठाण्यातील कर्मचारी आदी जण उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker