बहुजन समाज पार्टीच्या नायगाव विधानसभा अध्यक्षपदी राजकुमार सोनकांबळे यांची बिनविरोध निवड

New Bharat Times नेटवर्क
नायगाव :– बहुजन समाज पार्टीच्या नायगाव विधानसभा अध्यक्षपदी नायगाव येथील धडाडीचे युवा सामाजिक कार्यकर्ते राजकुमार किशन सोनकांबळे यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. नरसी येथील शासकीय विश्रामगृहात आयोजित पक्षाच्या विशेष बैठकीत ही घोषणा करण्यात आली.
नायगाव, उमरी आणि धर्माबाद विधानसभा मतदारसंघासाठी नवीन कार्यकारिणी गठीत करण्यासाठी या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी पक्षाचे राज्य कार्यकारिणी सदस्य इंजि. चंद्रप्रकाश देगलूरकर, मराठवाडा झोन प्रभारी मनिषभाऊ कावळे, नांदेड जिल्हा अध्यक्ष सुभाष भोकरे, नांदेड महानगर अध्यक्ष अनिकेत आळंदीकर आणि पत्रकार प्रकाश कामळजकर यांची प्रमुख उपस्थिती होती.
कार्यकारिणीतील इतर नवनियुक्त पदाधिकारी:
बैठकीत सर्वानुमते खालील पदाधिकाऱ्यांच्या निवडीवर शिक्कामोर्तब करण्यात आले:
- विधानसभा प्रभारी: देविदास महाजन जेठेवाड, अविनाश पुंडलिकराव इटकापल्ले
- महासचिव: मनोहर गंगाराम डुमणे
- उपाध्यक्ष: ओमप्रकाश बळी वाघमारे
- लिंगायत भाईचारा कमिटी: मुकुंदा लक्ष्मण चोंडेकर
- नायगाव शहराध्यक्ष: बंटी नायगावकर
पक्षाचे काम तळागाळापर्यंत पोहोचवणार
निवडीनंतर सर्व नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचे पुष्पहार घालून जल्लोषात स्वागत व अभिनंदन करण्यात आले. “पक्षाची विचारधारा आणि निळे निशाण नायगाव, उमरी व धर्माबाद तालुक्यातील प्रत्येक घराघरात पोहोचवून पक्ष संघटन मजबूत करणार,” असा निर्धार नवनिर्वाचित अध्यक्ष राजकुमार सोनकांबळे व इतर पदाधिकाऱ्यांनी यावेळी व्यक्त केला.



