शंकरनगर जवाहर नवोदय विद्यालयाची विद्यार्थिनी चित्रकला स्पर्धेत राज्यात अव्वल

मोरे मनोहर
किनाळा :- जवाहर नवोदय विद्यालय शंकरनगर तालुका बिलोली येथे असलेल्या केंद्र शासनाच्या शाळेतील विद्यार्थी हे अभ्यासात हुशार असतातच त्यासोबतच विविध कला गुण ते जोपासत असतात या कलागुणांच्या जोरावर इयत्ता नववीची विद्यार्थिनी कु.स्नेहा भूताळे या विद्यार्थिनीने विविध चित्र रेखांकित केले आहेत तिचे चित्र हे नांदेड जिल्हा तसेच महाराष्ट्र राज्याच्या विविध स्पर्धेत उच्च दर्जाचे गुण प्राप्त करून ती यशस्वी होते तसेच भारतातून विविध स्तरावर ती स्पर्धेमध्ये भाग घेत असते. नुकतेच महाराष्ट्र शासनाच्या द्वारे घेण्यात आलेल्या इंटरमीडिएट ड्रॉइंग स्पर्धेमध्येझ A ग्रेड घेऊन ती राज्यात अव्वल येण्याचा बहुमान पटकावली आहे.

कु.स्नेहा भूताळे या इयत्ता नववी वर्गात शिकणाऱ्या विद्यार्थिनीने रेखाटलेले चित्र नांदेड जिल्ह्यासह महाराष्ट्रातील विविध स्पर्धेत उच्च दर्जाचे गुण प्राप्त करून राज्यात अव्वल येण्याचा बहुमान पटकावले असून तिचे रेखाटन केलेले चित्र हे आता देशाच्या स्पर्धेत भाग घेण्यासाठी पात्र ठरले असुन तिला शाळेचे कलाशिक्षक श्री आनंद माळी यांनी मार्गदर्शन केले आहे.

कुमारी स्नेहा भूताळे ही विद्यार्थिनी अतिशय शिस्त प्रिय आणि शांत सुस्वाभावी असून तिला बालपणापासून चित्र रेखाटण्याची आवड असल्याने तिचे रेखाटन केलेले चित्र हे भविष्यात देश पातळीवर अवल ठरतील असा विश्वास शाळेचे कलाशिक्षक आनंद माळी यांनी व्यक्त केले.

कु.स्नेहा भूताळे हिने रेखाटन केलेली चित्र राज्यासह देशातील स्पर्धेत भाग घेण्यासाठी पात्र ठरल्याने तिच्या या कलागुणांचे विद्यालयाचे प्राचार्य श्री सुहास मांडले यांनी व शाळेचे कलाशिक्षक आनंद माळी, व शाळेचे शिक्षक यांनी अभिनंदन करून तिच्या पुढील कार्यास शुभेच्छा दिले.
