दोन मोटारसायकलच्या अपघातात तिघांचा मृत्यू, तीन जण गंभीर जखमी

अंकुशकुमार देगावकर
नायगाव : दोन मोटारसायकलची आमने सामने धडक होऊन झालेल्या अपघातात तीन जणाचा मुत्यु झाला तीन जण जखमी झाल्याची घटना दि.१२ रोजी रात्री ८.३० वाजता आलुवडगाव फाट्याजवळ घडली असुन तीन जखमीवर नांदेड च्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरू असल्याचे पोलीसां कडून सांगण्यात आले.
तालुक्यातील टाकळी तमा येथील साईनाथ शंकर कोकणे, दिगांबर उर्फ आकाश नागनाथ साखरे, ओमकार जयवंत लाडेकर हे दि.१२ रोजी रात्री ८ नंतर गडगा गावाकडे मोटारसायकल वरून निघाले होते .आलुवडगाव फाट्याच्या समोर येताच समोरून येणारी मोटारसायकल ची समोरासमोर जबर धडक झाली यात दोन्ही मोटारसायकल वरील सहा जणही जखमी होऊन रस्त्यावर पडले होते .रस्त्यावरून येणां-या जाणां-याणी वाहने थांबवून जखमींना नायगाव रूग्णालयात दाखल केले.
येथील वैधकिय अधिका-यांनी जखमींची तपासणी केले असता टाकळी त.मा.येथील ओमकार जयवंत लाडेकर यास मृत घोषित केले व जखमीवर प्रथम उपचार करून पुढील उपचारासाठी नांदेड येथे पाठविण्यात आले. नांदेड येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू असताना आलुवडगाव येथील चंद्रकांत समर्थ इंगोले वय ३५ व विलास अंतेश्र्शर इंगोले यांचा रात्री उशीरा मृत्यु झाला तर टाकळी येथील दोन जखमी व आलुवडगाव येथील दतात्र्य मोहन इंगोले यांच्यावर उपचार सुरू असुन टाकळी येथील एका जखमींची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात आले.
अपघातात मृत झालेल्या ओमकार लाडेकर यांच्या दि.१३ रोजी सकाळी साडे आकरा वाजता टाकळी त.मा येथे तर आलुवडगाव येथील चंद्रकांत इंगोले व विलास इंगोले यांच्यावर दुपारी १२ वाजता आलुवडगाव येथे शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. घटनेची माहीती मिळताच नायगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अजित कुंभार, पो.जमदार गणपतराव पेदे, बाबुराव चरकुलवार, बालाजी शिंदे यांनी घटनास्थळी पोहचुन पंचनामा केले. यात चद्रकांत इंगोले यांना तीन मुली व एक मुलगा तर विलास इंगोले यांना तीन मुलीच असल्याचे सांगण्यात आले.