ठाणेताज्या बातम्यामहाराष्ट्र

भारतीय संविधानाच्या अमृत महोत्सवी वर्षा निमित्ताने मानवतेचा प्रकाश या काव्य संग्रहाचा प्रकाशन सोहळा ज्येष्ठ साहित्यिक प्रा.शुक्राचार्य गायकवाड यांच्या हस्ते संपन्न

New Bharat Times नेटवर्क

ठाणे :- भारतीय संविधानाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त बौध्द साहित्य प्रसार संस्था केंद्रीय कार्यकारणी संचलित महाराष्ट्र समितीव्दारा आयोजित मानवतेचा प्रकाश या काव्य संग्रहाचे कळवा येथील नालंदा बुध्दविहारात मोठ्या दिमाखात आणि जल्लोषात प्रकाशन कार्यक्रमाचे अध्यक्ष ज्येष्ठ साहित्यिक प्रा. शुक्राचार्य गायकवाड यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी त्यांनी “मानवतेचा प्रकाश हा काव्य संग्रह हा आशावादी व मानवाच्या हितासाठी असून समाजाला प्रकाशमान करील. हा काव्यसंग्रह प्रकाशीत करताना मला जो आनंद झाला आहे तो मी शब्दात व्यक्त करू शकत नाही .” असे असे प्रतिपादन केले.

यावेळी प्रमुख पाहुणे राजरत्न अडसुळ यांनी , “नवोदीत कविंना मिळालेला एक प्लॅटफॉर्म प्रा. शुक्राचार्य गायकवाड सरांनी बौध्द साहित्य प्रसार संस्थेच्या माध्यमातून निर्माण केल्याने त्याची एक प्रचिती म्हणजेच मानवतेचा प्रकाश हा काव्यसंग्रह होय”. असे आपले मत यावेळी व्यक्त केले. या पुस्तकावर बोलण्यासाठी प्रमुख वक्ते म्हणून अॅड. धम्मकिरण चन्ने व भीमराव रायभोळे यांनी आपले मोलाचे विचार मांडून पुस्तकावर प्रकाश टाकला.

मानवतेचा प्रकाश या काव्यसंग्रहाची प्रकाशक म्हणून प्रकाशकीय भुमीका मांडताना भटू जगदेव यांनी, “पैसे अभावी जे पुस्तक रूपाने साहित्य काढू शकत नाहीत त्यांच्यासाठी अनित्य प्रकाशन मार्फत वाजवी दरात ना नफा न तोटा, सबबवर पुस्तक छापण्याचे ठरविले आहे ” असे यावेळी सांगितले तर संपादकीय भुमीका नवनाथ आनंदा रणखांबे यांनी मांडताना, ” लिहित्या हाताला प्रेरणा, प्रोत्साहन आणि बळ देण्यासाठी साहित्यिक नवी पिढी घडवण्याचे आणि मराठी साहित्य विश्व समृद्ध करण्यासाठी मानवतेचा प्रकाश या पुस्तकाची निर्मिती आम्ही केली आहे.

जास्तीत जास्त नवोदित आणि ज्येष्ठांच्या साहित्याला विनामूल्य “मानवतेचा प्रकाश” या काव्यसंग्रह ग्रंथाच्या रूपाने संधी देण्याचा आम्ही प्रयत्न केलेला आहे ” असे मत व्यक्त केले. या प्रसंगी मान्यवरांचा सन्मानपत्र, शाल, पुस्तक व पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला.

45 मान्यवर कवींनी तसेच समाजातील सर्व स्तरावरील मान्यवरांसहित बौध्द साहित्य प्रसार संस्था पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांनी नालंदा बुध्द विहार खच्चुन भरला होता. या सोहळ्याचे सूत्रसंचलन आशा नवनाथ रणखांबे यांनी केले तर आभार प्रदर्शन शाम बैसाणे यांनी मानले.

दुसऱ्या सत्रात संविधान व डॉ. बाबासाहेब आंबेडकर या विषयावर कवी संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. यात 47 मान्यवर कवींनी सहभाग घेतला घेतला. या प्रसंगी मारुती कांबळे, शाम बैसाणे, वृषालीताई करलाद, मनिषा मेश्राम, अतुल शेलार, शैलेश कर्डक, शाहिर बाळासाहेब जोंधळे, चंद्रकांत शिंदे, कामीनी धनगर, विवेक मोरे, डॉ. सुरेंद्र शिंदे, के. पुरुषोत्तम, अॅड. श्रीकृष्ण टोबरे, विजय ढोकळे ,अॅड नेताजी कांबळे, कांतीलाल भडांगे, वसंत हिरे, सुनिल मोरे, रूपाली शिंगे, सुभाष आढाव, वृशाली माने.

प्रा.अरूण अहिरराव, सुरेखा गायकवाड, अकबर इसमाईल म्हमदुल, सदा भांबुळकर, धनंजय सरोदे, साहेबराव कांबळे, बबनदादा सरवदे, गजानन गावंडे, मास्टर राजरत्न राजगुरू, नवनाथ रणखांबे, भटू जगदेव, अॅड धम्मकिरण चन्ने, व रविकिरण मस्के व प्रा.शुक्राचार्य गायकवाड इत्यादी कवींनी संविधान व डॉ.बाबासाहेब आंबेडकर या विषयानुरूप आंबेडकरी मूल्ये जपणाऱ्या कविता, गझल सादर केल्या.

सर्व कवींना सन्मानपत्र, ग्रंथ आणि गुलाब पुष्प देऊन गौरवण्यात आले. कविसंमेलनाच्या कार्यक्रमाचे सुत्रसंचलन रविकिरण मस्के यांनी केले तर आभार मनिषा मेश्राम यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी बौध्द साहित्य प्रसार संस्था व बौध्द विकास मंडळांनी अथक परिश्रम घेतले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker