लोहा तालुक्यातील युवा शेतकरी रत्नाकर पाटील यांचा राष्ट्रपती भवनात २६ जानेवारी रोजी सन्मान…
मारतळा :- नांदेड जिल्ह्यातील लोहा तालुक्यातील मौजे सायळ येथील शेतकरी रत्नाकर पाटील यांनी ‘जैव ऊर्जा आणि सेंद्रीय शेती’ या क्षेत्रात केलेले उलेखनिय कार्य आणि योगदानामुळे त्यांना २६ जानेवारी २०२५ रोजी भारताच्या ७६ व्या प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमासाठी नवी दिल्ली येथील राष्ट्रपती भवनात भारताच्या महामहीम राष्ट्रपती महोदय यांचेतर्फे विशेष आमंत्रित करण्यात आले आहे. तळागाळातील शेतकऱ्यांच्या उन्नतीसाठी कायम कटिबद्ध असलेल्या रत्नाकर पाटील यांना मिळालेल्या या सनमानाबद्दल सर्वस्तरातून त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.
महामहीम राष्ट्रपती मुर्मू यांच्या माध्यमातून मिळालेल्या या मान्यतेसाठी रत्नाकर पाटील यांनी भारतीय पोस्ट ऑफिस नांदेड, सह्याद्री डीडी वाहिनी प्रतिनिधी व भारत सरकारचे सर्व कर्मचारी यांचे आभार मानले आहेत. त्यांना प्रमाणपत्र आणि काही मूल्यवान साहित्य सन्मान म्हणून पाठविण्यात आले आहे. लोहा तालुक्यातील नव्हे तर नांदेड जिल्ह्याच्या या शेतकरी नेतृत्वाला मिळालेला सन्मान हा त्यांचे कार्यातून ओळखला जात आहे आणि भविष्यात शेतकरी समुदायासाठी नवीन दिशा प्रदान करेल, अशी आशा व्यक्त केली जात आहे. युवा शेतकरी रत्नाकर पाटील यांचा सर्व स्तरावर कौतुक होत असून त्यांना यापूर्वी देखील महाराष्ट्र शासनाचा युवा शेतकरी हा पुरस्कार मिळाला आहे.
त्यांच्या सेंद्रिय शेती व्यवसायातील जडन घडणी मध्ये परभणी विद्यापीठाचे कुलगुरु प्रा.डॉ.इन्द्र मणि यांच्यासह सर्व शास्त्रज्ञांचा मोलाचा वाटा असल्यामुळे त्यांनी कुलगुरु प्रा.डॉ.इन्द्र मणि यांची दिनांक १० जानेवारी रोजी भेट घेऊन कृतद्यनता व्यक्त करुन सर्वांचे आभार मानले. यानिमित्त विद्यापीठात रत्नाकर गंगाधर ढगे यांचा कुलगुरु प्रा.डॉ.इन्द्र मणि यांच्या हस्ते यथोचित सत्कार करण्यात आला.
यावेळी कुलगुरु म्हणाले की, रत्नाकर गंगाधर ढगे यांना मिळालेला सन्मान हा सर्व शेतकऱ्यांच्या शेतीविषयी असलेल्या निष्ठेचे प्रतिक आहे. हा सन्मान म्हणजे मराठवाड्यातील सर्व शेतकयांचा सन्मान आहे. भविष्यात मराठवाडयातील अनेक शेतकऱ्यांना हि संधी लाभावी अशी इच्छा त्यांनी व्यक्त केली.
यावेळी विद्यापीठाचे शास्त्रज्ञ डॉ.स्मिता सोलंकी, डॉ अनंत गोरे, डॉ.प्रविण कापसे, पपिता गौरखेडे प्रगतीशिल शेतकरी पंडीतराव थोरात, जनार्धन आवरगंड, प्रकाश हरकळ, रामेश्वर साबळे, विजय जंगले, राजेंद्र ठोकर यांच्यासह आदी उपस्थित होते.