शिवप्रसाद मठवाले यांची बाबासाहेब आंबेडकर राज्यस्तरीय समता गौरव पुरस्कारासाठी निवड

मोरे मनोहर
किनाळा :- डॉ.बाबासाहेब आंबेडकर प्रतिष्ठान नांदेड च्या वतीने प्रतिवर्षी दिल्या जाणारा डॉ. बाबासाहेब आंबेडकर समता गौरव राज्यस्तरीय पुरस्कार सन 24- 25 हे जाहीर झाले असून या पुरस्कारासाठी प्रशासकीय यंत्रणेत कार्य करणारे शिवप्रसाद बसलींगआप्पा मठवाले कुंचेलीकर सहाय्यक लागवड अधिकारी कळमनुरी यांची निवड करण्यात आल्याचे डॉ.बाबासाहेब आंबेडकर प्रतिष्ठान नांदेडच्या वतीने सिने अभिनेते डॉ.प्रमोद अंबाळकर, प्राचार्य प्रताप नरवाडे, अध्यक्ष त्रिरत्न कुमार भवरे यांनी जाहीर केले आहे.
या पुरस्कारासाठी निवड केलेले शिवप्रसाद मठवाले हे कुंचेली तालुका नायगाव येथील रहिवासी असून ते सध्या सहाय्यक लागवड अधिकारी म्हणून कळमनुरी येथे कार्यरत आहेत. प्रशासकीय सेवेत त्यांनी वन विभागात व सामाजिक वनीकरणात केलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल त्यांना हा राज्यस्तरीय पुरस्कार देण्यात येत आहे. शिवप्रसाद मठवाले हे अष्टपैलू व्यक्तिमत्व असून वन कर्मचारी संघटनेत कर्मचाऱ्यांच्या न्याय, हक्कासाठी लढा उभा केला आहे. त्यांच्या अंगी असलेल्या अमोघ वक्तृत्व शैलीने नागरी व शहरी भागात, शाळा, महाविद्यालयात वन आणि पर्यावरणाविषयी, वन व वन्यजीवाविषयी, शासकीय योजनांविषयी प्रभावीपणे जनजागृती करून पर्यावरणाचे महत्त्व पटवून दिलेले आहे.
शिवप्रसाद मठवाले यांनी किनवट बोधडी, इस्लापूर, कळमनुरी या भागात प्रभावीपणे वन संरक्षण केले असून सागवान तस्करावर टाकलेल्या अनेक धाडीत त्यांचा सहभाग आहे त्यांनी अनेक रोपवाटिका व यशस्वी रोपवनांची निर्मिती केली आहे. मठवाले है सामाजिक कार्यात धडाडीचे व्यक्तिमत्व असून त्यांनी सहकारी वन कर्मचाऱ्यांमध्ये लोकप्रिय व्यक्तिमत्व म्हणून एक छबी निर्माण केली आहे त्यांच्या या कार्याची दाद वनकर्मचारी व सामाजिक राजकीय, क्षेत्रातील मान्यवरांनी नेहमीच घेतले आहे त्यामुळे मठवाले यांना ह्या सन्मान पूर्वक पुरस्काराने सन्मानित करण्यात येत आहे.
सदर पुरस्कार वितरण समारंभ दि. 24 जानेवारी 20 25 रोजी सोनारी फाटा ता.हिमायतनगर येथे आठव्या एक दिवशीय बौद्ध धम्म परिषदेमध्ये पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार असून या पुरस्कार वितरण समारंभासाठी मा.खा.नागेश पाटील आष्टीकर, मा.खा.रवींद्र चव्हाण, श्रीमती सूर्यकांताताई पाटील माजी केंद्रीय मंत्री, मा.आ.बालाजी कल्याणकर मा.आ.हेमंत पाटील, मा.आ.भीमराव केराम, मा.आ.बाबुराव कोहळीकर, मा.आ.माधवराव पाटील जवळगावकर, प्रा डॉ.मोहन मोरे इत्यादी मान्यवरांच्या शुभहस्ते शिवप्रसाद मठवाले कुंचेलेकर यांना पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे. मठवाले यांना हा मानाचा असलेला राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर झाला असल्याने त्यांचे सर्व स्तरामधून अधिकारी कर्मचाऱ्यांच्या वतीने अभिनंदन केल्या जात आहे.