नागणी येथे अवैध वाळू वाहतूक करणारा हायवा पकडला ◆ कुंडलवाडी पोलीस व महसूल प्रशासनाची संयुक्त कारवाई
◆२० लाख ६ हजारांचा मुद्देमाल जप्त ◆ आज पहाटे ४:३० वाजता कारवाई
कुंडलवाडी :- शहरापासून जवळच असलेल्या नागणी येथे अवैध वाळू वाहतूक करणारा हायवा दि. १७ जानेवारी रोजी सकाळी ४ वाजून ३० वाजेच्या सुमारास पकडला आहे. ही कारवाई कुंडलवाडी पोलीस व महसूल प्रशासनाने संयुक्त कारवाई करून पकडला आहे. या कारवाईत २० लाख ६ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असल्याची माहिती प्राप्त झाली आहे.
कुंडलवाडी पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक भागवत नागरगोजे व महसूल प्रशासनाचे नायब तहसीलदार रघुनाथसिंह चौहान यांच्या पथकाची रात्रीच्या वेळी गस्त चालु असताना १७ जानेवारी रोजी पहाटे ४ वाजून ३० मिनिटांनी नागणी येथे अवैध वाळू वाहतूक करणारा हायवा क्र.एम एच ४६ ए आर १७९९ थांबवण्यात आला.
चालकास रॉयल्टी ची पावती विघारणा केली असता कोणतीही कागदपत्रे आढळून आली नसल्याने हायवा क्रमांक व त्यातील ५ ब्रास रुपयांची वाळू असा २० लाख ६ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करून हायवा कुंडलवाडी पोलीस ठाण्याच्या प्रांगणात लावण्यात आला आहे.