एलसीबी नांदेड च्या पथकाने धर्माबादेत जप्त केली पिस्टल ; गुन्हेगारी प्रवृत्तीच्या पंटर चा आक्का कोण?
सौ.मीना भद्रे
धर्माबाद :- हळू हळू धर्माबाद शहरात गुन्हेगारी प्रवृत्ती वाढत आहे नांदेड एलसीबी च्या पथकाने गुप्तपने धाड टाकून एक पिस्टल जप्त केली व आरोपी विरुध्द गुन्हा दाखल करून त्यास ताब्यात घेऊन पुढील चौकशी सुरू केली आहे.
तरुण पिढीला वाईट मार्गाला लावण्यासाठी वेगवेगळे आमिष दाखवून त्यांच्या आडून आपले डाव आखनारे कोण याचा शोध घेणे गरजेचे बनले आहे. गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या पंटर लोकांचे अक्का कोण? त्यांचा या विषयात कितपत सहभाग आहे याचा तपास लागला पाहिजे तसेच शहरात आणखी कोणा कडे अशी जीवघेणे शस्त्र आहेत या दिशेने तपास करणे पण तितकेच महत्त्वाचे आहे.
धर्माबाद शहर शांत संयमी आणि संस्कृत शहर म्हणून ओळखले जाते अशा ठिकाणी घातक शस्त्र हस्तगत करण्यात आले असल्याने एकच खळबळ उडाली आहे. नांदेड एलसीबी च्या पथकाने अतीशय चपळाईने गुप्त पद्धतीने करवाई करून पिस्टल आणि आरोपी ताब्यात घेतले आहे.
स्थानिक पोलीस प्रशासनाने देखील तोंडवर करीत असलेली गुन्हेगारी पार्श्वभूमी संपुष्टात आणण्यासाठी प्रयत्नशील राहून कडक कारवाई करावी अशी प्रतिक्रिया शहरातील सुज्ञ नागरिक व्यक्त करीत आहेत.