डॉ.मिनल पाटील खतगावकर यांचा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रमाने उत्साहात साजरा

मोरे मनोहर
किनाळा :- नांदेड जिल्ह्याच्या रणरागिणी असलेल्या रामतीर्थ जिल्हा परिषद मतदार संघाच्या माजी जिल्हा परिषद सदस्या तथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या तरुण युवा कार्यकर्त्या डॉ.सौ. मीनल निरंजन पाटील खतगावकर यांच्या वाढदिवसानिमित्त शंकरनगर (रामतीर्थ) तालुका बिलोली येथे नायगाव मार्केट कमिटीचे संचालक संतोष पाटील पुयड रामतीर्थकर यांच्या वतीने विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करून त्यांचा हा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
सामाजिक कार्याची जाण असलेल्या एक कर्तृत्ववान महिला राजकारणातील एक अभ्यासू व्यक्तिमत्व सामान्य जनतेच्या प्रश्नाची कशी सोडवणूक करावी याची जाण असणाऱ्या आणि जिल्हा परिषद च्या माध्यमातून सर्वात अधिक रामतीर्थ जिल्हा परिषद मतदार संघातील विविध गावाचा सर्वांगीण विकास करणाऱ्या डॉ. सो मीनल पाटील खतगावकर यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने नायगाव मार्केट कमिटीचे संचालक संतोष पाटील कुयड रामतीर्थकर यांच्या वतीने विविध कार्यक्रमाचे आयोजन करून रामतीर्थ प्राथमिक आरोग्य केंद्रातील रुग्णांना फळे वाटप करण्यात आली तर अपंग व गरजू महिलांना छत्री व साडी चोळी देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला.
लोकशाहीमध्ये चौथा स्तंभ म्हणून कार्य करणाऱ्या शंकरनगर येथील पत्रकार बांधवांचा छत्री देऊन सन्मान करण्यात आला याप्रसंगी संतोष पाटील पुयड, शिवलिंग पाटील देगलूरे, विजय पाटील, विकास वाडेकर, विलास चंदणे, वैजनाथ रोकडे, चंद्रकांत स़तरकर, यासह पत्रकार हनमंत पाटील वाडेकर, यशवंत मोरे, गंगाधर कांबळे, आनंद पाटील डाकोरे, मोरे मनोहर आदिसह गावातील अनेक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
शंकरनगर येथे हिप्परगा माळ सेवा सोसायटीचे माजी चेअरमन सदाशिवराव पाटील डाकोरे यांच्या वतीने डॉ. मीनल पाटील खतगावकर यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने मिठाई वाटप करून त्यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला सदाशिवराव पाटील डाकोरे हे माजी खासदार भास्करराव पाटील खतगावकर यांचे निष्ठावंत कार्यकर्ते म्हणून त्यांच्याकडे अनेक वर्षापासून पाहिले जाते.