अर्धापुर पोलीसांनी संशयीत राशनच्या तांदळाचा ट्रक पकडला : आठरा लाखाचा मुद्देमाल ताब्यात

अंकुशकुमार देगावकर
नायगाव : आँपरेशन फ्लश आऊट अंतर्गत अर्धापूर पोलिसांनी रविवारी एक संशयित। राशनच्या तांदळाचा ट्रक पकडला असून जवळपास 18 लाखाचा मुद्देमाल ताब्यात घेतला आहे. या कारवाई बद्दल जिल्हा पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांनी अभिनंदन केले आहे.
जिवनावश्यक वस्तु कायदा नुसार कार्यवाही करण्याचे आदेश दिले होते. त्या अनुषंगाने आँपरेशन फ्लश आऊट अंतर्गत पोलीस निरिक्षक चंद्रशेखर कदम, पोस्टे अर्धापुर यांचे मार्गदर्शनाखाली पथकातील पोलीस अधीकारी व पोलीस अंमलदार हे अवैध धंद्यावर कार्यवाही करण्याकरीता शासकीय जीप क्रमांक एमएच-26/आर-0525 वाहनामध्ये पेट्रोलींग करीत असतांना गुप्त बातमीदारां मार्फत माहीती मिळाली की, एका ट्रक मध्ये तांदुळ भरून चोरटया बाजारात विक्री करण्याकरीता नेत आहेत.
खात्रीशीर माहीती मिळाल्यावरून पोलीस अधीकारी व पोलीस अंमलदार यांनी सदर संशयीत ट्रक जांभरून येथे थांबवुन तपासणी केली असता आत तांदुळ असल्याचे दिसुन आले. संबधीत ट्रकच्या चालकास सदर तांदळाच्या कागदपत्रा बाबत चौकशी केली असता कोणतेही कागदपत्र दाखवले नसल्यामुळे सदर ट्रक क्रमांक एमएच 22 केए-3366 किंमती 10 लाख व त्यातील संशयीत राशनचा तांदुळ किंमती 7 लाख 96 हजार 485 असा एकुण 17 लाख 96 हजार 485 चा मुद्देमाल मिळुन आल्याने, सदरचा मुद्देमाल ताब्यात घेवुन पोस्टेला आणण्यात आले आहे.
सदर ट्रकमधील तांदुळ हा राशेनचा आहे किंवा कसे या बाबत पुरवठा विभागला पत्रव्यवाहर करून पुढील कायदेशिर कार्यवाही करण्याचे आदेश पोउपनि श्री सुरेश भोसले, पोस्टे अर्धापुर यांना दिले आहेत. पोहेकों विजय आडे, पोकों महेंद्र डांगे, विजय कदम सर्व नेमणुक पोस्टे अर्धापुर तसेच मा. पोलीस अधीक्षक साहेब यांचे पथक क्रमांक 06 मधील पोउपनि श्री प्रवीण हालसे, पोहेकों ब्राम्हानंद लामतुरे, पोकों राम मुळे, महाचंद्रमुणी कांबळे, व चालक पोहेकों पंढरी जाधव, यांनी पार पाडुन चांगली कामगीरी केली आहे. वरिष्ठांनी त्यांचे अभिनंद केले आहे.