किनाळा येथे महिलांकरिता पोषण आहार कार्यशाळा संपन्न

मोरे मनोहर
किनाळा :- किनाळा तालुका बिलोली येथे दि.19 सप्टेंबर रोजी संस्कृती संवर्धन मंडळ सगरोळी यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या महिला करता पोषण आहार कार्यशाळेत संस्थेच्या सौ.पंचफुलाताई वडडे यांनी महिलांना निरोगी आरोग्यासाठी पोषण आहाराचे महत्व समजून सांगितले.
ग्रामीण भागातील अनेक महिला आपल्या आहाराकडे लक्ष देत नाहीत यामुळे अनेक महिलांचे आरोग्य निरोगी राहत नाही यासाठी महिलांनी आपल्या निरोगी आरोग्यासाठी आहाराकडे लक्ष दिले पाहिजे यासाठी सांस्कृतिक संवर्धन मंडळ सगरोळी यांच्या वतीने महिलांसाठी किनाळा येथे पोषण आहार कार्यशाळेचा आयोजन करण्यात आले होते यावेळी महिलांना मार्गदर्शन करताना सौ.पंचफुलाताई वडडे यांनी महिलांनी आरोग्य सशक्त ठेवण्यासाठी सकस आहाराचा वापर करावा,मोड आलेले कडधान्य,बाजरी ज्वारी ची भाकरी, सर्व प्रकारच्या दाळी भाजीपाला, सर्व प्रकारचे फळांचा आहारात वापर करावा, दूध दही ताक तुप, केळी, अंडी या पदार्थांचा आहारात समावेश करावा असे सांगून महिलांनी आपले घर परिसर स्वच्छ ठेवावे, पाले भाज्या विशेषता शेवग्याच्या शेंगा पाला याचा उपयोग आरोग्यासाठी उत्तम आहे अशी माहिती दिली.
यावेळी आशा वर्कर सौ.वंदना मोरे व गावातील अनेक महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.