नांदेड देगलूर राज्य महामार्गावर असलेले शंकरनगर येथील एटीएम फोडून विस लाख रुपये लंपास
मोरे मनोहर
किनाळा :- नांदेड देगलूर राज्य महामार्गावर शंकरनगर तालुका बिलोली येथे असलेले एसबीआय बँकेचे एटीएम दि.19 सप्टेंबर रोजी पहाटे तीन ते चार च्या सुमारास एका पांढऱ्या रंगाच्या फोरविलर गाडी मधून आलेल्या अज्ञात चोरांनी गॅस कटरने एटीएम कापून एटीएम मधे असलेली सुमारे 20 लाख 43 हजार रुपये चोरून नेल्याची घटना घडली असून याप्रकरणी एटीएम मॅनेजर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून रामतीर्थ पोलिसात अज्ञात तीन आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सविस्तर माहिती अशी की नांदेड देगलूर राज्य महामार्गावर रामतीर्थ पोलीस स्टेशन पासून जवळच असलेले शंकरनगर येथील एसबीआय चे एटीएम दिनांक 19 सप्टेंबर रोजी पहाटे पांढऱ्या रंगाच्या फोर व्हीलर मधून आलेल्या चोरट्याने एटीएम जवळ असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यावर प्रथम काळ्या रंगाचे स्प्रे मारून सीसीटीव्ही कॅमेरा बंद केले, नंतर एटीएम च्या बाजूला असलेल्या घरातील व्यक्ती घराबाहेर येऊ नये म्हणून त्यांच्या घराच्या गेटला बाहेरून दस्तीने बांधून एटीएम मध्ये प्रवेश करून त्यांच्या सोबत घेऊन आलेल्या गॅस कटरच्या साह्याने एटीएम कापून एटीएम मधील सुमारे 20 लाख 43 हजार रुपये रक्कम लंपास केले.
पहाटे तीन ते चार च्या सुमारास एटीएम मध्ये चोरी होत असल्याची चाहूल एटीएम च्या बाजूला असलेल्या घरातील व्यक्तींना होताच सदरील घटनेची माहिती घरातून रामतीर्थ पोलिसांना मोबाईल वरून कळवले असता रामतीर्थ पोलीस स्टेशनच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली मात्र तोपर्यंत चोरट्यांनी एटीएम फोडून एटीएम मधील रक्कम लंपास करण्यात यशस्वी झाले.
ही घटना घडल्याचे समजतात घटनास्थळी रामतीर्थ पोलीस स्टेशनचे सपोनी श्रीधर जगताप यांनी धाव घेऊन सदरील घटनेची माहिती वरीष्ठ अधिकाऱ्यांना कळविले असता सदरील घटनास्थळी नांदेड येथील श्वान पथक, फिंगर प्रिंट पथक, याबरोबर दोन एलसीबी चे पथक व बिलोली येथील पोलीस उपविभागीय अधिकारी बाळकृष्ण हानपुढे पाटील यांनी घटनास्थळी येऊन घटनेची पहानी केले एटीएम फोडण्यासाठी आलेल्या पांढऱ्या रंगाची फोरविलर गाडी व तीन चोरटे अनेक सीसीटीव्ही कॅमेऱ्यात असल्याचे दिसून येत आहेत.
या प्रकरणी एटीएम मॅनेजर कैलास कांबळे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून रामतीर्थ पोलीस ठाण्यात अज्ञात तिन चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस स्टेशनचे सपोनी श्रीधर जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक शिवराज नरवाडे हे करीत आहेत.