शांतता व सुव्यवस्था राखून सण-उत्सव साजरे करा सपोनि भागवत नागरगोजे यांचे आवाहन

कुंडलवाडी :- आगामी काळात नवरात्रोत्सव व दसरा सण साजरा केला जाणार आहे. हे सण व उत्सव शांतता व सुव्यवस्था राखून साजरे करावे, असे आवाहन कुंडलवाडी पोलीस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक भागवत नागरगोजे यांनी केले.कुंडलवाडी पोलिस ठाण्यात नवरात्रोत्सव व दसरा सणानिमित्त शहर व परिसरात शांतता व सुव्यवस्था राखण्यासाठी दि.२९ सप्टेंबर रोजी शांतता समितीच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते.

पुढे बोलताना सपोनि भागवत नागरगोजे म्हणाले की,आपल्या देशात अनेक जाती धर्माचे लोक राहतात. त्यामुळे विविध जाती-धर्मानुसार सण-उत्सव साजरे केले जातात. आपण सर्व भारतीय समजून एकमेकांचे उत्सव शांततेत व उत्साहात पार पडतील व कोणत्याही धर्माच्या भावना दुखावणार नाही याची आपण प्रत्येकाने दक्षता घ्यावी. सण व उत्सव काळात कायदा व सुव्यवस्थेचे पालन काटेकोरपणे करावे.
तसेच ठरलेल्या वेळेतच दुर्गा मातेचे विसर्जन करण्यात यावे, दुर्गा सजावटीचे अनुषंगाने दुर्गाच्या अंगावरील दागिने, मौल्यवान धातूचे मुखवटे,महिलांची दागिने याची काळजी घ्यावे,महिला व मुलींच्या सुरक्षिततेला प्राधान्य द्यावेbअसे आवाहन सहाय्यक पोलीस निरीक्षक भागवत नागरगोजे यांनी यावेळी केले. यावेळी शहर व परिसरातील नवरात्रोत्सव समितीचे पदाधिकारी व कार्यकर्ते,शांतता समितीचे पदाधिकारी व कार्यकर्ते, नागरिक आदीजण यावेळी उपस्थित होते.
कमी कालावधीमध्ये गणेशोत्सव व मुस्लिम समाजाचा ईद-ए-मिलाद सण सहायक पोलीस निरीक्षक भागवत नागरगोजे यांच्या योग्य समन्वयामुळे शांततेत पार पाडून कुंडलवाडी शहर व परिसरात सुरक्षिततेचे वातावरण निर्माण केले आहे.