बिलोलीत मंगेश कदम यांच्यावतीने होतकरू मुलीस शिलाई मशीन भेट
जयवर्धन भोसीकर
बिलोली :- शिवसेना शिंदे गटाचे एस.सी एस. टी. ओबीसी विभागाचे जिल्हा प्रमुख मंगेश कदम यांनी बिलोली शहरातील आर्थिक दुर्बल घटक कुटुंबातील एका होतकरू मुलीस शिलाई मशीन देऊन तिला स्वावलंबी जीवन जगण्यास मदत केली आहे. यापूर्वी हि मंगेश कदम यांनी देगलूर -बिलोली मतदासंघात तसेच नांदेड जिल्ह्यात आत्महत्या ग्रस्त व वडिलांचे छत्र हरवलेल्या मुलींना, विधवा महिलांना शिलाई मशीनचे वाटप केले आहे.
शिवसेना एस. सी. एस. टी. ओबीसी विभागाचे जिल्हाप्रमुख मंगेश कदम यांनी सामाजिक बांधिलकी जपत आजपर्यंत गोरगरीब कुटुंबातील महिलांना शिलाई मशीनचे वाटप केले आहे. यापूर्वी बिलोली तालुक्यातील गंजगांव, अर्जापूर, देगलूर तालुक्यातील तुप्प शेळगाव, लोणी तसेच नांदेड शहरातील अनेक कुटुंबियाना मंगेश कदम यांनी शिलाई मशीनचे वाटप केले आहे.
बिलोली शहरातील संजय कानूरे यांची मुलगी भवानी हिने शिवणक्लास पूर्ण करूनही घरची कौटंबिक परस्थिती हलाखीची असल्याने तिला शिलाई मशीन उपलब्ध होऊ शकली नाही. हि बाब मुलीचे वडील संजय कानूरे यांनी मंगेश कदम यांच्या कानावर घालताच कदम यांनी कानूरे यांच्या मुलींला उदरनिर्वाहाचे साधन म्हणून व स्वतःच्या पायावर उभे टाकण्यासाठी तिला शिलाई मशीन भेट दिली.
कदम यांनी आजपर्यंत अनेक समाज उपयोगी कामे केली असून अनेक बेरोजगार युवक युवतींना वेगवेगळ्या महामंडळाकडून तसेच जिल्हा उद्योग केंद्र, खादी ग्रामोद्योग कार्यालय मार्फत व अनेक महिला व पुरुष बचत गटांना कर्ज उपलब्ध करुन देऊन अनेक महिला पुरुषांना व्यवसायिक बनविले आहे. वेळोवेळी ते गरजू लोकांना मदत करतात त्यांच्या या सेवाभावी व इतरांना वेळोवेळी मदत करण्याची वृत्ती, विकासात्मक दूरदृष्टी यामुळे मुळे तरोडा भागातील मतदारांनी त्यांना व त्यांच्या कुटुंबियांना तब्बल सहा वेळेस निवडून दिले आहे.
मंगेश कदम यांचे सामाजिक कार्य उल्लेखनीय – कृष्णाताई ठकरोड
बिलोली शहरातील भवानी कानूरे हि होतकरू मुलगी शिवणकाम येत असूनही हलाखीच्या परिस्थितीमुळे एका ठिकाणी कामास जाऊन वडिलांस हातभार लावत होती.तिच्या हलाखीच्या परिस्थितीची दखल घेऊन मंगेश कदम यांनी तिला उदरनिर्वाह करण्यासाठी शिलाई मशीन देऊन स्वतःच्या पायावर उभे राहण्यास मदत केली असून त्यांचे हे सामाजिक कार्य उल्लेखनीय असल्याचे मत सामाजिक कार्यकर्त्यां सौ.कृष्णाताई ठकरोड यांनी व्यक्त केले.
याप्रसंगी सायन्ना केशोड, सुनील सनमुखे, महेंद्र गायकवाड, सुनील भास्करे, संतोष पानकर, सुनील सूर्यवंशी, प्रभाकर वटरकर, श्रीकांत गादगे,नारायण कांबळे, पीराबाई तुम्मोड,भूमेश केशोड, अर्जुन केशोड, पुष्पाबाई वटरकर, लक्ष्मीबाई वटरकर, नागमणी वटरकर, गंगाबाई दरवेशी, इंद्राबाई नागेश्वर, पोतनबाई गुडमलवार, नरसाबाई केशोड, नागमणी केशोड, सुनीता केशोड, लक्ष्मीबाई कांबळे हे उपस्थित होते.