ताज्या बातम्यादेगलुरनांदेड

उदगीर शहरात मसाज सेंटरच्या नावाखाली कुंटणखाना : लातूर पोलीसाकडून कारवाई

New Bharat Times नेटवर्क

उदगीर : शहरात मसाज सेंटरच्या नावाखाली सुरु असलेल्या वेश्या व्यसायावर लातूर पोलिसांनी कारवाई करत दोन पिडीत महिलांची सुटका केली आहे. सदरची कारवाई दि. 2 आक्टोबर रोजी करण्यात आली आहे. उदगीर सारख्या शहरात मसाज सेंटरमध्ये कुंटणखाना चालत असल्याने खळबळ उडाली आहे. या प्रकरणी तिघांच्या विरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. उदगीर शहरात लातूर पोलिसांनी कारवाई केली असल्याने वेगवेगळ्या चर्चेला उधाण आले आहे.

देगलूर रोडवरील सोनवणे पेट्रोल पंपाजवळ पिटर इंग्लंड शर्ट दुकानाच्या वरच्या मजल्यावर बेला स्पा अँड मसाज सेंटर या नावाने नव्या अनेक दिवसापासून वेश्याव्यवसाय सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. या माहितीवरून बुधवारी लातूर दहशतवाद विरोधी पथकात कार्यरत असलेले आयुब शेख यांनी ग्रामीण पोलिसांच्या मदतीने पावणे चार वाजेच्या दरम्यान या मसाज सेंटरवर धाड टाकली.

पीटर इंगलण्ड शर्ट दुकानाच्यावर द बेला स्पा अँण्ड बॉडी मसाज सेंटर उदगीर येथे स्वतःच्या आरोपीने महिलांना आर्थिक अमिष दाखवून वेश्या व्यवसाय करण्यास भाग पाडले. मसाज सेंटरच्या नावाखाली कुंटणखाना चालवला असे पोलिसांनी तक्रारीत नमूद केले असून. यातील आरोपी संपती भगवान खुणे व गोपाळ माने यांनी स्वतःच्या आर्थिक फायदयाकरीता कुंटनखाना चालविण्याकरीता जागा उपलब्ध करून दिली. तसेच सदर घटनास्थळाच्या दोनशे मीटरच्या आत दवाखाना व मार्केट आहेत. संदीपान शिंदे व वरील दोन अशा तीन आरोपीवर ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलिस निरीक्षक राजकुमार पुजारी करत आहोत.

पिडीतेची महीला सुधारगृहात रवानगी
या प्रकरणी बुधवारी रात्री उशिरा पिडित महिलांना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांची रवानगी महिला सुधारगृहात केली आहे. याप्रकरणी अजून कोणत्या महिला बळी पडल्या आहेत का? याची सखोल चौकशी करण्यात येत असल्याची माहिती पोलीस निरीक्षक पुजारी यांनी सांगितले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker