उमरी येथे डाक विभागाची अतिक्रमण हटाव मोहीम

उमरी :- भारतीय डाक विभाग भारत सरकार यांचे मालकीचे उमरी नगरपालिका हद्दीतील विभागीय प्लॉटवरील अतिक्रमण हटविण्यासाठी दिनांक 15 ऑक्टोबर 2024 रोजी अतिक्रमण हटाव मोहीम राबविण्यात येणार आहे.

उमरी नगरपालिका हद्दीतील डाक विभागाच्या मालकीचे विभागीय प्लॉट नगरपालिका मालमत्ता क्रमांक 77 आणि 78 यावरील अतिक्रमण स्वतः हून काढून घेण्यासाठी डाक विभागातर्फे अतिक्रमण धारकांना दिनांक 8 ऑक्टोबर पासून 13 ऑक्टोबर 2024 पर्यंत ध्वनीक्षेपकाच्या सहाय्याने जाहीर प्रकटनाद्वारे सुचित करण्यात आले होते. परंतु अद्यापही अतिक्रमण धारकांनी अतिक्रमण काढून घेतलेले नाही.
तरी दिनांक 15 ऑक्टोबर 2024 रोजी सकाळी 10.00 वाजता धडक अतिक्रमण हटाव मोहिमेद्वारे सदरचे अनधिकृत बांधकाम, अनधिकृत शेड डाक विभागाद्वारे नष्ट करण्यात येणार असल्याची माहिती डाक विभागाच्या नांदेड विभागीय कार्यालयाद्वारे देण्यात आली..