गावाकडच्या बातम्यानांदेडबिलोली

सोयाबीनची रास घरी आणताना कॅनलमध्ये ट्रॅक्टर पलटी होऊन एक महिला जागीच ठार

मोरे मनोहर

किनाळा :- शेतातील सोयाबीनची रास ट्रॅक्टर मध्ये भरून घराकडे येत असताना ट्रॅक्टर कॅनॉल मध्ये पलटी होऊन झालेल्या अपघातात टाकळी तालुका नायगाव येथील दैवशाला गोविंद मोटरगे वय वर्ष 35 ही महिला ट्रॅक्टरच्या ट्रॉली खाली किचकुण जागीच ठार झाली तर राजाबाई सायबु उसकुलवाड ही महिला गंभीर जखमी झाली असून अन्य तिघेजण किरकोळ जखमी झाल्याची घटना 14 ऑक्टोंबर रोजी 6 च्या सुमारास घडली.

सविस्तर माहिती अशी की टाकळी तालुका नायगाव येथील गोविंद गंगाराम मोटरगे हे आपल्या स्वतःच्या शेतातील सोयाबीनची रास करण्यासाठी सकाळी आपली पत्नी दैवशाला मोटरगे व गावातील राजाबाई सायबु उसकुलवाड आणि सायबु उसकुलवाड यांना घेऊन सोयाबीनची रास केल्यानंतर झालेली सोयाबीनची रास ट्रॅक्टर मध्ये भरून घराकडे येत असताना टाकळी शिवारात बारूळ धरणाचे पाणी येणाऱ्या कॅनल मध्ये सदरील ट्रॅक्टर पलटी झाल्याने या अपघातात ट्रॅक्टरच्या हेड खाली दैवशाला गोविंद मोटारगे आणि राजाबाई सायबु उसकुलवाड या दोघी कॅनॉल मध्ये पडलेल्या ट्रॅक्टरच्या हेड खाली अडकल्या तर सायबु उसकुलवाड आणि अन्य एक जन व ट्रॅक्टरचा चालक हे मात्र बाजूला पडल्याने ते किरकोळ जखमी झाले.

ही घटना घडल्याचे समजतात गावातील अनेक जण घटनास्थळी धाव घेऊन कॅनॉल मध्ये ट्रॅक्टर खाली अडकलेल्या महिलांना बाहेर काढण्याचा प्रयत्न केले परंतु काढता येत नसल्याने अखेर नरसी येथून क्रेनला बोलावून तब्बल दीड तासानंतर ट्रॅक्टर कॅनॉल मधून उचलण्यात आले मात्र यावेळी ट्रॅक्टर खाली दबलेल्या दैवशाला मोटरगे यांचा जागीच मृत्यू झाला तर राज्याबाई सायबु हि गंभीर जखमि झाल्याने तिला पुढील उपचारासाठी नायगाव येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले.

दैवशाला मोटरगे हिचा मृतदेह नायगाव येथील शासकीय रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवून देण्यात आला आहे ही दुःखद घटना घडल्याचे समाजताच सर्वत्र शोककळा पसरली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker