89 नायगाव विधानसभाताज्या बातम्यानायगांव

नायगाव विधानसभा निवडणूक : छाणणीत रासपच्या उमेदवारासह 9 अर्ज बाद

प्रकाश महिपाळे

नायगाव : विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल केलेल्या अर्जाची बुधवारी दि.30 रोजी झालेल्या छाणणीत रासपचे उमेदवार हनुमंतराव वनाळे यांच्यासह 9 अर्ज अवैध ठरले आहेत. शेवटच्या दिवसापार्यंत प्रचंड गर्दी जमवून आणि जोरदार शक्ती प्रदर्शन करत 35 उमेदवारांनी 48 अर्ज दाखल केले होते.

नायगाव विधानसभेसाठी दि. 20 नोव्हेंबर रोजी मतदान होणार असून ही निवडणूक तिरंगी किंवा चौरंगी होण्याची शक्यता आहे. काँग्रेसच्या वतीने डॉ.मिनल खतगावकर तर भाजपच्या वतीने विद्यमान आमदार राजेश पवार आणि वंचित बहूजन आघाडीच्या वतीने डॉ. माधव विभूते व मनोज जरांगे यांच्या सुचनेनी मराठा उमेदवार शिवराज होटाळकर यांच्या 35 उमेदवारांनी दि. 29 पर्यंत 48 उमेदवारी अर्ज दाखल केले होते.

मंगळवार पर्यंत दाखल झालेल्या उमेदवारी अर्जाची बुधवारी दि. 30 ला छाणणी झाली. यावेळी रासपचे उमेदवार हनमंतराव वनाळे यांचा पक्षाचा व अपक्ष भरलेले दोन्ही अर्ज अवैध ठरले आहेत. त्याचबरोबर तनाजी श्रीरामवार भाजप, मारोतराव कुह्राडे, उमेश धोटे, रावसाहेब पवार, शिवेंद्र दुगावकर, इरन्ना सुर्यकार, अविनाश इटकापल्ले बहुजन समाज पार्टी, जळबा गवळे अदि उमेदवारांचे अर्ज अवैध ठरले आहेत. काँग्रेसच्या डॉ.मिनल खतगावकर, आ.राजेश पवार यांच्यासह 26 उमेदवारांचे अर्ज वैध ठरले आहेत.

नायगाव तालुक्यातील परडवाडीचे माजी सरपंच हनमंतराव वनाळे यांनी राष्ट्रीय समाज पार्टी आणि अपक्ष असे दोन भरलेले अर्ज छाणणीत अवैध ठरवण्यात आले. या प्रकारामुळे संतापलेले वनाळे यांनी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या या निर्णयाच्या विरोधात न्यायालयात दाद मागणार असल्याचे सांगितले.

निवडणूक विभागाचा संथ कारभार…
धर्माबादच्या उपविभागीय अधिकारी स्वाती दाभाडे या विधानसभा निवडणुकीच्या निवडणूक निर्णय अधिकारी आहेत. पण कुठलीच माहिती त्या वेळेवर उमेदवारांना सुध्दा देत नाहीत. आग्रह धरल्यास आरेरावीची भाषा वापरत असल्याचा आरोप होत आहे त्यामुळे त्यांच्या या कारभाराची दखल जिल्हा निवडणूक आयोगाने घ्यावी अशी मागणी होत आहे.

नायगावसह हदगाव विधानसभा मतदारसंघात उमेश सिद्धराम धोटे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता. मात्र दि. 30 रोजीच्या छाणणीत दोन्ही ठिकाणी भरलेले अर्ज अवैध ठरले आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker