मोटरसायकलच्या अपघातात एक तरुण जागीच ठार
देगलूर- नांदेड राज्य महामार्गावर बिलोली तालुक्यातील हिप्परगामाळ येथे झाला अपघात

मोरे मनोहर
शंकरनगर :- मुखेड तालुक्यातील होकर्णा येथील रहिवासी असलेले राहुल आनंद गोणारे वय वर्ष (३०) यांचे दि.३० ऑक्टोबर रोजी सकाळी अकराच्या दरम्यान नांदेड देगलूर राज्य महामार्गावर असलेल्या हिप्परगा माळ शिवारात मोटरसायकला एका वाहनाची धडक होऊन झालेल्या या भिषण अपघातात जागीच ठार झाला.
होकर्णा येथील रहिवासी असलेले राहुल आनंद गोणारे हा नरसी येथे मिस्त्री चे काम करण्यासाठी राहत होते. ते मोटरसायकल घेऊन नरसीहुन देगलुरकडे जात असताना दि.30 ऑक्टोंबर रोजी सकाळी अकरा वाजण्याच्या दरम्यान ते देगलूर – नांदेड राज्य महामार्गावर असलेल्या बिलोली तालुक्यातील हिप्परगा माळ जवळ आले असता.
त्यांच्या मोटरसायकलला कुण्यातरी अज्ञात वाहनाने जोराची धडक दिली असल्याने त्यांचा या झालेल्या भिषण अपघातात त्यांच्या डोक्यावरून वाहन गेल्याने डोक्याचा व शरीराचा चेंदामेंदा होऊन रोडवर पोटातील काळिज रोडवर पडले तर शरीरापासून मुंडेचा पूर्ण रोडवर डोक्याच्या कवटीचे हाड पडुन तो जागीच ठार झाला.
सदरील घटनेची माहिती रामतीर्थ पोलिसांना मिळताच त्यांनी घटनास्थळी दाखल झाले सदरील तरुणांचे नायगाव येथील शासकीय रुग्णालयात शवविच्छेदन करून नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले हि घटना घडल्याचे समजताच होकरना येथे शोककळा पसरली होती.
हा अपघात कंटेनरनी मयताच्या मोटरसायकला धडक दिल्याच्या संशयावरून रामतीर्थ पोलिसांनी एका कंटेनरला ताब्यात घेतले असून सदरील कंटेनर रामतीर्थ पोलीस ठाण्यात लावण्यात आले असून पुढील तपास केला जात असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली.
केटी कंट्रक्शन च्या दुर्लक्षपणामुळे अपघातात वाढ…
नरसी ते हिपरगा माळ हा सुमारे तीन ते चार किलोमीटर चा रस्ता अनेक अवजड वाहनाच्या दाबाने नाल्यांपडून दबल्याने या नाल्यातून मोटर सायकल व लहान मोठे वाहन जात असताना या मार्गावर अनेक लहान-मोठे अपघात होत असताना या कडे केटी कंट्रक्शन सोयीस्कर दुर्लक्ष करत असल्याने अनेकांना आपला जीव या रस्त्यावर गमवावा लागत आहे.
संबंधित केटी कंट्रक्शन ने नादुरुस्त झालेला रस्ता दुरुस्त तात्काळ करावा अन्यथा केटी कंट्रक्शन च्या विरोधात तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा सामाजिक कार्यकर्ते तथा नायगाव मार्केट कमिटीचे संचालक यादवराव पाटील भेलोंडे यांनी यावेळी दिला.