ताज्या बातम्यानांदेडमाहुर

राष्ट्रीय महामार्गावर वाई बाजार येथे अपघात ; मोटरसायकलची ट्रकला मागून धडक दोन जागेवर ठार एक गंभीर

New Bharat Times नेटवर्क

माहूर : तालुक्यातील धनोडा ते कोठारी राष्ट्रीय महामार्गावरील वाई बाजार येथील वाघाई टेकडी जवळ रस्त्यावर उभा असलेल्या ट्रकला मोटरसायकलची मागून जोरदार धडक. यात मोटरसायकल वरील तिघांपैकी दोघे जागीच ठार तर एक जण गंभीर जखमी. सदरची घटना दि. 23 रोजी दुपारी 4 वाजताच्या दरम्यान घडली आहे.

माहूर तालुक्यातून धनोडा ते कोठारी राष्ट्रीय महामार्गावर वाघाई टेकडी जवळ रस्त्याच्या बाजूला बीकेसी कंपनीचा ट्रक ए पी 39, यु एक्स 6876 उभा होता. तर एम एच 26, एफ 4238 या क्रमांकाच्या मोटारसायकलवर असोली साईनगर येथील तरुण विट्ठल राठोड (वय 30)वर्ष आणि अर्जुन विठ्ठल राठोड (वय10 )वर्ष सोबत एक आंध्रप्रदेशातील वयोवृद्ध अंदाजे 65 वर्ष हे तिघे आसोली ते लसनवाडी येथे जात होते.

यावेळी वाघाई टेकडीजवळ मोटारसायकल चालकाचे नियंत्रण सुटल्याने ट्रकवर मागील बाजूस धडकली. या धडकेत तरुण विट्ठल राठोड व अन्य एकाच्या डोक्यात तोंडाला छातीला मार लागल्याने त्यांचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला तर दहा वर्षीय अर्जुन गंभीर जखमी झाला आहे.

सदरच्या अपघाताची घटना कळताच सिंदखेडचे स.पो.नी.रमेश जाधवर यांनी घटनास्थळी धाव घेऊन मयतासह जखमींना माहूरच्या ग्रामीण रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले. येथे डॉ मंगेश नागरगोजे यांनी दोघांचा मृत्यू झाल्याचे घोषित करून जखमी अर्जुन वर उपचार सुरू आहेत अपघातात दोघांचा मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker