परिक्षेतील नकला भोवल्या : केंद्र संचालक अनकाडे यांचे निलंबन

अंकुशकुमार देगावकर
नायगाव : नायगाव येथील केंद्र संचालक आर.ए. अनकाडे यांनी माध्यमिक शालांत व उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परिक्षेच्या कामात कसूर व हयगय केल्यामुळे त्यांच्यावर नायगाव पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला. त्यामुळे अनकाडे यांनी सादर केलेला खुलासा अमान्य करुन त्यांना दि. 3 मार्च पासून जिल्हा परिषदेच्या सेवेतून निलंबित करण्यात आले आहे. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकांच्या या निर्णयावर तालुक्यात उलटसुलट चर्चा सुरू आहेत.

जिल्हा परिषद शाळा घुंगराळा येथील मुख्याध्यापक आर.ए.अनकाडे यांची जनता माध्यमिक विद्यालय, नायगांव केंद्र क्र.5274 येथे केंद्रसंचालक म्हणून नियुक्ती केली असता सदरील केंद्रसंचालक यांनी त्यांचे माध्यमिक शालांत व उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा- 2025 च्या कामात हयगय केली असून कर्तव्यात कसूर केल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे त्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली होती. मात्र सदर प्रकरणात पोलिस स्टेशन, नायगांव येथे गुन्हा नोंद झाला. तत्पूर्वी अनकाडे यांनी संदर्भीय नोटीसी प्रमाणे आपण सादर केलेला खुलासा सादरही केला होता. परंतु खुलासा अमान्य करण्यात आला.
खुलासा अमान्य करण्यात आल्यानंतर आर.ए.अनकाडे यांनी मंडळाच्या कामात गैरवर्तणूक करुन महाराष्ट्र जिल्हा परिषद जिल्हा सेवा (वर्तणूक) नियम 1967 चेनियम 3 चा भंग केल्यामुळे त्यांना महाला जिल्हा परिषद जिल्हा सेवा (शिस्त व अपील) नियम 1964 चे नियम 3 नुसार दि. 03/03/2025 पासून जिल्हा परिषद सेवेतून निलंबीत करीत आहे असे आदेश जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी मिनल करणवाल काढले आहेत. निलंबन काळात संबंधिताचे मुख्यालय जिल्हा परिषद हायस्कूल बिलोली येथे ठेवण्यात आले आहे.