89 नायगाव विधानसभाताज्या बातम्यानांदेड

शनिवारी दुपारी अमित देशमुख यांची उमरी येथे जाहीर सभा

प्रकाश महिपाळे

नायगाव : नांदेड लोकसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार प्रा. रवींद्र चव्हाण व नायगाव विधानसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार डॉ. मीनल पाटील खतगावकर यांच्या प्रचारार्थ उमरी येथे माजी मंत्री आ.अमितभैया देशमुख यांची जाहीरसभा आयोजित करण्यात आली आहे.

नांदेड लोकसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार प्रा. रवींद्र चव्हाण व नायगाव विधानसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार डॉ. मीनल पाटील खतगावकर यांच्या प्रचारार्थ शनिवार (ता.९) नोव्हेंबर २०२४ रोजी दुपारी १२ वाजता मोंढा मैदान उमरी येथे काँग्रेसचे नेते, माजी मंत्री आ.अमितभैया देशमुख यांची जाहीर सभा आयोजीत करण्यात आले आहे.

या जाहीर सभेस माजी खासदार भास्करराव पाटील खतगावकर, माजी मंत्री डॉ.माधवराव किन्हाळकर, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष भगवानराव आलेगावकर, कार्यायध्यक्ष भास्कर पाटील भिलवंडे, शिवसेनचे जिल्हाध्यक्ष बंडू खेडकर, माधव पावडे, बबन बारसे, कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष हाणमंतराव पाटील बेटमोगरेकर, जिल्हाध्यक्ष बी. आर.कदम, माजी आ. अविनाश घाटे, हाणमंतराव पाटील चव्हाण, श्रीनिवास चव्हाण, विजय चव्हाण, बाळासाहेब पाटील खतगावकर, रवी पाटील खतगावकर, गणेशराव पाटील करखेलीकर, आदि उपस्थित राहतील.

या जाहीर सभेस नांदेड जिल्हयातील व नायगाव विधानसभात मतदारसंघातील जास्ती-जास्त कार्यकर्त्यानी उपस्थित रहावे असे आवाहन कॉंग्रेस, राष्ट्रवादी (शरद पवार गट), शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे गट) कॉंग्रेसचे तालुकाध्यक्ष प्रल्हाद पाटील इज्जतगावकर, शिवसेनेच तालूकाध्यक्ष बालाजी सावंत व महाविकास आघाडीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यातर्फे करण्यात आले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker