ताज्या बातम्यानांदेडमहाराष्ट्र

संविधान दिनानिमित्त धनेगाव येथे वंचित बहुजन आघाडीतर्फे भव्य आरोग्य शिबिर उत्साहात संपन्न

नेत्र तपासणी, दंत तपासणी व सर्वरोग निदान शिबिराला महिला, ज्येष्ठ नागरिक आणि विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

धनेगाव : भारतीय संविधान दिनानिमित्त वंचित बहुजन आघाडी, नांदेड दक्षिणच्या वतीने शनिवार, दि. २८ नोव्हेंबर २०२६ रोजी धनेगाव (ता. जि. नांदेड) येथे भव्य मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरामध्ये नेत्र तपासणी, दंत तपासणी तसेच सर्वरोग निदान करण्यात आले. या सामाजिक उपक्रमाला महिला, ज्येष्ठ नागरिक आणि शालेय विद्यार्थ्यांचा मोठा प्रतिसाद लाभला.

या आरोग्य शिबिराचे उद्घाटन वंचित बहुजन आघाडीचे राज्य प्रवक्ते फारूक अहमद, राज्य उपाध्यक्ष गोविंद दळवी, माजी जिल्हाध्यक्ष शिवा भाऊ नरंगले आणि सम्यक विद्यार्थी आंदोलनाचे प्रदेश प्रवक्ते कैलास वाघमारे यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले.

यावेळी नांदेड दक्षिण जिल्हाध्यक्ष शंकर महाजन, महानगर अध्यक्ष विठ्ठल गायकवाड, जिल्हा महासचिव रवी पंडित, युवा आघाडीचे महानगर अध्यक्ष गोपालसिंग टाक, जिल्हा उपाध्यक्ष विद्यानंद पवळे, जिल्हा सचिव रंगनाथ गजले, जिल्हा उपाध्यक्ष गणपत सवयी, सोनकांबळे गौतम डुमणे यांच्यासह वंचित बहुजन आघाडीचे विविध पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या शिबिरात परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवून आपल्या डोळ्यांची, दातांची तसेच सर्वसाधारण आरोग्याची तपासणी करून घेतली. विशेषतः महिला, ज्येष्ठ नागरिक आणि विद्यार्थ्यांनी या शिबिराचा लाभ घेतला. नागरिकांच्या आरोग्याविषयी जागरूकता निर्माण करणे आणि गरजू नागरिकांना आरोग्य तपासणीची सुविधा उपलब्ध करून देणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश होता.

या उपक्रमाच्या आयोजनासाठी वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा उपाध्यक्ष प्रा. विनायक गजभारे यांनी पुढाकार घेतला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अनिल वाघमारे यांनी केले. आरोग्य शिबिर यशस्वी करण्यासाठी विकास जोंधळे, विशाल सावते, चेतन गजभारे, राष्ट्रपाल गजभारे, साईनाथ गजभारे, वैभव गजभारे, सूरज चिंचोरे, आशिष सोनकांबळे यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घेतले.

संविधान दिनाचे औचित्य साधून समाजोपयोगी आरोग्य उपक्रम राबविल्याबद्दल विविध मान्यवरांनी आयोजकांचे कौतुक करून शुभेच्छा दिल्या. सामाजिक बांधिलकी जपत नागरिकांच्या आरोग्य सेवेसाठी आयोजित केलेले हे शिबिर उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!