होमगार्ड जवानांनी निष्ठापूर्वक प्रामाणिकपणे कर्तव्य पार पाडावे ; जिल्हा समादेशक तथा अपर पोलीस अधीक्षक संदीप जाधव यांचे आवाहन

प्रकाश कांबळे
नांदेड :- होमगार्ड जवान यांनी आपले कर्तव्य निष्ठापूर्वक व प्रामाणिकपणे पार पाडावे. असे आवाहन होमगार्डचे जिल्हा समादेशक तथा अपर पोलीस अधीक्षक संदीप जाधव यांनी बुधवारी येथे बोलताना केले.
दि.१९ नोव्हेंबर पासून सुरू असलेल्या जिल्ह्यातील पुरुष होमगार्ड यांच्या उजळणी प्रशिक्षण शिबीरास आज भेट दिल्यानंतर मार्गदर्शन करताना ते बोलत होते. यावेळी केंद्र नायक संतोष जैस्वाल, समादेशक अधिकारी प्रकाश कांबळे,प्रमुख लिपिक अभिषेक देशमुख यांची उपस्थिती होती.

पुढे बोलताना संदीप जाधव म्हणाले की, पोलीस दलाला होमगार्ड यांचे नेहमी सहकार्य लाभते.निष्काम सेवा हे ब्रीदवाक्य असलेल्या होमगार्ड जवानांचे चांगले काम आहे.आगामी काळात देखील सर्व होमगार्ड जवानांनी आपले काम निष्ठा पूर्वक प्रामाणिकपणे पार पाडावे.
शिबिरातील होमगार्ड जवानांनी परेड कमांडर वरिष्ठ पलटन नायक बळवंत अटकोरे यांच्या नेतृत्वाखाली अपर पोलीस अधीक्षक संदीप जाधव यांना सशस्त्र मानवंदना दिल्यानंतर त्यांनी सर्व जवानांचे मुक्त कंठाने कौतुक केले तसेच आपल्या अडीअडचणी सोडविण्यासाठी मी नेहमीच प्रयत्न करीन, अशी ग्वाही त्यांनी यावेळी बोलताना दिली.
सदर उजळणी प्रशिक्षण शिबिरामध्ये सहभागी असलेल्या होमगार्ड जवानांना पदकवायत, लाठी कवायत, रायफल कवायत, प्रथमोपचार, अग्निशमन, पूर विमोचन,आपत्ती व्यवस्थापन आदींचे प्रशिक्षण देण्यात येत आहे.
शिबीर काळात उपप्रादेशिक परिवहन कार्यालयातील मोटार वाहन निरीक्षक नेहा शिंदे यांनी होमगार्ड यांना वाहतुकीचे नियम, वाहतूक सुरक्षा आदीबाबत सविस्तर मार्गदर्शन केले.
शिबिर यशस्वीतेसाठी केंद्र नायक संतोष जैस्वाल, प्रशासिक अधिकारी वैशाली डावरे, समादेशक अधिकारी प्रकाश कांबळे, प्रमुख लिपिक अभिषेक देशमुख, कनिष्ठ लिपिक पूजा शिंदे, वरिष्ठ पलटन नायक बशिरोद्दीन शेख, वरिष्ठ पलटन नायक बळवंत अटकोरे, हनुमंत देवकते, भारत कंधारे, प्रकाश कांबळे, संतोष चव्हाण, गोविंद चिखलवाड, अतुल इंगोले आदी परिश्रम घेत आहेत.



