ताज्या बातम्यानांदेडनायगांव

नायगाव-नांदेड महामार्गावर देगाव फाट्याजवळ रोपवाटिकेसमोर मोटरसायकलची धडक ; दोघे किरकोळ जखमी

प्रकाश महिपाळे

नायगाव :- नायगाव-नांदेड महामार्गावरील देगाव येथील रोपवाटिकेजवळ दोन मोटर सायकलची धडक झाल्याची घटना घडली. या अपघातात दोन्ही वाहनांचे किरकोळ नुकसान झाले असून दोघे जण किरकोळ जखमी झाले आहेत. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही.

मिळालेल्या माहितीनुसार, कोलंबी येथील मुस्तफा शेख यांच्या मालकीचे वाहन क्रमांक (MH 26 CK 0876) आणि मुगाव येथील, सध्या नायगाव येथे वास्तव्यास असलेले माधव गंधकवाड यांच्या वाहन क्रमांक (MH 26 BS 5996) यांच्यात देगाव येथील रोपवाटिकेजवळ धडक झाली.

घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी तातडीने धाव घेत मदतीचा हात पुढे केला व घटनेची माहिती रुग्णवाहिका आणि पोलिसांना दिली. त्यानंतर जखमींना तातडीने पुढील उपचारासाठी नायगाव येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले.

या घटनेची माहिती मिळताच कुंटूर पोलिस ठाण्याचे बिट जमादार साई सांगवीकर यांनी तत्परतेने मदतकार्य राबवून जखमींना वेळेवर रुग्णालयात पोहोचविण्यासाठी सहकार्य केले. दरम्यान, या अपघातामुळे नायगाव-नांदेड महामार्गावरील वाहतुकीच्या सुरक्षिततेचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!