मुंबई येथील संविधान सन्मान महासभेसाठी नांदेड जिल्ह्यातील संविधानवादी व आरक्षणवादी जनतेला सहभागी व्हावे- शंकर महाजन

नांदेड : भारतीय संविधानाचे संरक्षण, लोकशाही मूल्यांची जपणूक आणि आरक्षणाचे अधिकार अबाधित ठेवण्यासाठी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने बुधवार, दि. २५ नोव्हेंबर २०२६ रोजी सायंकाळी ४ वाजता मुंबई येथील छत्रपती शिवाजी महाराज पार्क, दादर येथे भव्य ‘संविधान सन्मान महासभेचे’ आयोजन करण्यात आले आहे.
वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय नेते श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली होणाऱ्या या महासभेत नांदेड जिल्ह्यातील सर्व संविधानवादी, आरक्षणवादी, आंबेडकरी विचारांचे अनुयायी, ओबीसी, एससी, एसटी, भटके-विमुक्त, अल्पसंख्याक समाजातील बांधव-भगिनी, युवक, महिला व विद्यार्थी यांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन लिंगायत ओ.बी.सी समाजाचे नेते वंचित बहुजन आघाडीचे नांदेड दक्षिण जिल्हाध्यक्ष शंकर महाजन यांनी केले आहे.
आज देशात संविधानिक मूल्ये, लोकशाही व्यवस्था, मताधिकार आणि आरक्षणाच्या अधिकारांबाबत गंभीर प्रश्न निर्माण होत आहेत. अशा परिस्थितीत फुले, शाहू, आंबेडकर यांच्या विचारांवर विश्वास ठेवणाऱ्या सर्वांनी एकत्र येऊन संविधानाच्या रक्षणासाठी आपली ताकद दाखविण्याची गरज आहे.
देश मनुवादाने नाही, तर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या संविधानाने चालला पाहिजे,’हा संदेश बुलंद करण्यासाठी नांदेड जिल्ह्यातील सर्व संविधानप्रेमींनी मुंबईतील महासभेत मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन शंकर महाजन यांनी केले आहे.



