राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी- शरदचंद्र पवार पक्षाकडून भारतीय संविधान गौरव दिन साजरा
डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन : संविधान प्रास्ताविका सामूहिक वाचन

नांदेड :- भारतीय संविधान गौरव दिन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी- शरदचंद्र पवार पक्षाचे शहर जिल्हाध्यक्ष डॉ.सुनील कदम यांच्या मार्गदर्शनाखाली विविध सामाजिक उपक्रमांतून नांदेडमध्ये आज साजरा करण्यात आला.

भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, प.पु.डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुर्णाकृती पुतळ्यास राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी-शरदचंद्र पवार पक्षाचे नांदेड शहर जिल्हा उपाध्यक्ष तातेराव पाटील आलेगांवकर यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करुन त्यांना व त्यांच्या कार्य-कर्तत्वास अभिवादन करण्यात आले. तसेच, भारतीय संविधान प्रास्ताविका प्रतींचे वाटप राष्ट्रवादी किसान सभेचे माजी प्रदेश प्रतिनिधी लक्ष्मणराव मा.भवरे यांच्यावतिने करण्यात येऊन प्रास्ताविकेचे सामूहिक वाचन यावेळी करण्यात आले.
यावेळी पक्षाचे ग्रामीण युवक जिल्हाध्यक्ष धनंजय सुर्यवंशी, लक्ष्मण भवरे, शहर जिल्हा सरचिटणीस व माजी नगरसेवक प्रकाश मुराळकर, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक नाना पोहरे, युनूसखान, महेंद्र कांबळे, सामाजिक न्याय विभागाचे शहर जिल्हाध्यक्ष मारोती चिवळीकर, अल्पसंख्याक सेलचे शहर जिल्हाध्यक्ष शफी उर रहेमान, ओबीसी सेलचे शहर जिल्हाध्यक्ष गंगाधर महाजन आदींसह पक्षाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.



