राजर्षी शाहू महोत्सवासाठी खासदार छत्रपती शाहू महाराजांना निमंत्रण

जयवर्धन भोसीकर
नांदेड :- नांदेड नगरीत होणाऱ्या राजर्षी शाहू महोत्सवाचे विशेष अतिथी म्हणून खासदार छत्रपती शाहू महाराज यांना निमंत्रण देण्यात आले व खासदार छत्रपती शाहू महाराज यांनी सांगितले की लवकरच तुम्हाला तारीख देण्यात येईल.
लोकराजा राजर्षी शाहू महाराज यांच्या ऐतिहासिक 150 व्या जयंती वर्षाच्या पार्श्वभूमी होणाऱ्या राजर्षी शाहू महाराज विचाराच्या कार्याचा प्रसार, प्रसार व्हावा या उद्देशाने नांदेड नगरीमध्ये भव्य स्वरूपात राजर्षी महोत्सव आयोजित केला आहे तरी या महोत्सवासाठी माननीय खासदार छत्रपती शाहू महाराज, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष श्री.नानाभाऊ पटोले यांची विशेष उपस्थिती राहणार आहे
प्रमुख पाहुणे म्हणून मा.खा.श्री.चंद्रकांत हांडोरे, मा.खा. वसंतराव चव्हाण, माजी मंत्री सत्यजित पाटील, माजी मंत्री अमित देशमुख उपस्थित राहणार आहेत तरी ऐतिहासिक महोत्सवाला ऐतिहासिक व प्राप्त होण्यासाठी आपण विशेष उपस्थित राहावे. राजर्षी शाहू महाराज यांच्या 150 व्या सुवर्ण महोत्सव जयंती वर्षाच्या ऐतिहासिक नांदेड येथे आयोजन करण्यात आले.
स्वागतअध्यक्ष राजेश पावडे, संयोजक सुरेश हटकर, संयोजन समितीचे अध्यक्ष प्रफुल सावंत व सचिव संजय कवठेकर, कार्याध्यक्ष सत्यपाल सावंत आदी संयोजन समिती आज कोल्हापुरी ते गेले असता माननीय श्री छत्रपती राजर्षी शाहू महाराज जन्मशताब्दी निमित्त खासदार शाहू महाराजांना निमंत्रण दिले व त्यांना भेट घेतली सोबत अनुसूचित विभागाचे जिल्हाध्यक्ष सुरेश दादा हटकर, अनुसूचित विभागाचे शहराध्यक्ष सत्यपाल सावंत, कोरका पिंपळगावचे सरपंच कालिदास कोरके, नांदेड शहर सचिव काँग्रेस कमिटी शेख मुख्तार, गणेश पावडे आदी मान्यवर उपस्थित होते.
छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांच्या दीडशे व्या जयंतीनिमित्त राज्य शासनाला वेळोवेळी स्मरण देऊन सुद्धा छत्रपती राजर्षी शाहू महोत्सव साजरा करण्यासाठी शासनाच्या वतीने आनसता दाखविण्यात असल्यामुळे राज शाहू महाराज समितीच्या माध्यमातून या कार्यक्रमाचे आयोजन करत असून छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांचे ध्येयधोरण हे सर्व समाजाला बहुजनांना सोबत घेऊन चालणारे होते त्यामुळे छत्रपती शाहूराजे हे लोकराजे म्हणून ओळखल्या जायचे त्यांच्या जीवनावर प्रकाश या निमित्ताने पुन्हा एकदा टाकण्यात येणार आहे अशी माहिती स्वागताध्यक्ष राजेश पावडे यांनी दिली.