ताज्या बातम्यानांदेडमहाराष्ट्र

नगराध्यक्षांची बदनामी केल्याप्रकरणी बिलोलीत एकावर गुन्हा दाखल ; सोशल मीडियावरील पोस्ट भोवली

प्रकाश महिपाळे


​नांदेड :- बिलोली नगरपालिकेचे विद्यमान नगराध्यक्ष संतोष लक्ष्मीकांतराव कुलकर्णी यांची सोशल मीडियाच्या माध्यमातून बदनामी केल्याप्रकरणी सुरेंद्र बाळकृष्ण बेळकोणीकर (रा. धर्माबाद, ह.मु. आर्मूर, जि. निजामाबाद) याच्याविरुद्ध बिलोली पोलीस ठाण्यात अदखलपात्र (NCR) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

​मिळालेल्या माहितीनुसार, संतोष कुलकर्णी हे गेल्या २० वर्षांपासून बिलोली नगरपालिकेत लोकप्रतिनिधी म्हणून कार्यरत असून सध्या ते नगरसेवक पदावर आहेत. दरम्यान, संशयित आरोपी सुरेंद्र बेळकोणीकर याने आपल्या फेसबुक अकाउंटवरून आणि व्हॉट्सअ‍ॅपच्या माध्यमातून कुलकर्णी यांच्याबद्दल आक्षेपार्ह व्हिडिओ आणि ऑडिओ क्लिप प्रसारित केल्या. या पोस्टमध्ये कुलकर्णी यांचा उल्लेख ‘महापापी’ असा करून त्यांच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवणारे विधान करण्यात आले होते.

​तक्रारीत नमूद केल्यानुसार, आरोपी बेळकोणीकर याने यापूर्वी धर्माबाद नगर परिषदेची निवडणूक लढवली होती, मात्र त्यात त्याचा पराभव झाला होता. राजकीय द्वेषातून आणि संतोष कुलकर्णी यांची जनमानसातील प्रतिमा मलिन करण्याच्या उद्देशाने त्याने हे कृत्य केल्याचे तक्रारीत म्हटले आहे. ३० एप्रिल २०२६ रोजी सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास ही घटना उघडकीस आली, जेव्हा कुलकर्णी यांना सोशल मीडियावरील या व्हायरल व्हिडिओबद्दल माहिती मिळाली.

​संतोष कुलकर्णी यांनी त्यांच्या शेतात २ मे ते ६ मे २०२६ या कालावधीत ह.भ.प. चंद्रशेखर महाराज देगलूरकर यांच्या ‘भागवत कथे’चे आयोजन केले आहे. या कार्यक्रमाला भाविकांनी उपस्थित राहू नये आणि महाराजांची दिशाभूल व्हावी, या कुहेतूने ही बदनामीकारक मोहीम राबवण्यात आल्याचा आरोपही कुलकर्णी यांनी केला आहे.

याप्रकरणी संतोष कुलकर्णी यांच्या फिर्यादीवरून बिलोली पोलिसांनी दि. ३ मे २०२६ रोजी कलम ५००, ५०१ आणि ५०४ अन्वये नोंद केली असून पुढील तपास पोलीस करत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker