ताज्या बातम्यानांदेडनायगांव

पेट्रोल पंपावर नियम धाब्यावर; ड्रम व कॅनद्वारे खुलेआम पेट्रोल विक्री

अंकुशकुमार देगांवकर

नायगाव :- मोटार वाहनात थेट भरण्याऐवजी प्लास्टिक कॅन, लोखंडी ड्रममध्ये पेट्रोल; स्फोटाचा धोका, तरी पुरवठा विभाग व पोलिसांचे दुर्लक्ष नायगाव तालुक्यात पेट्रोलियम कायद्यानुसार पेट्रोल डिझेल केवळ वाहनाच्या टाकीतच देणे बंधनकारक असताना, नायगाव तालुक्यातील अनेक पेट्रोल पंपांवर ड्रम व प्लास्टिक कॅनद्वारे खुलेआम पेट्रोल डिझेल विक्री सुरू आहे. दिवसाढवळ्या 200 लिटरचे ड्रम व 5-10-35 लिटरचे कॅन भरून दिले जात असल्याने मोठ्या अपघाताची भीती व्यक्त होत आहे. पुरवठा विभाग व पोलिसांचे ‘अर्थपूर्ण दुर्लक्ष’ असल्याचा आरोप होत आहे.

‘नो कॅन, नो ड्रम’चा बोर्ड फक्त नावाला

केंद्र सरकारच्या पेट्रोलियम नियम 2002 व स्फोटक कायद्यानुसार प्लास्टिक कंटेनरमध्ये पेट्रोल देण्यास सक्त मनाई आहे. आपत्कालीन परिस्थितीत केवळ धातूच्या अधिकृत कॅनमध्ये व लेखी परवानगीने पेट्रोल देता येते.
प्रत्यक्षात नायगाव शहरालगत असणारे  पंपांवर सर्रास 35 लिटरचे प्लास्टिक कॅन, 200 लिटरचे ड्रम भरून दिले जातात. ‘नो हेल्मेट, नो पेट्रोल’चा बोर्ड लावला, पण ‘नो कॅन’चा नियम मात्र सोयीस्करपणे विसरला, अशी स्थिती आहे. टेम्पो मध्ये मोठं मोठे कॅन ड्रम द्वारे मोठ्या प्रमाणात विक्री केल्या जात आहे प्रशासन मात्र याकडे जाणून-बुजून दुर्लक्ष करत असल्याचा सामान्य नागरिकांकडून आरोप करण्यात येत आहे

काळाबाजार व अपघाताला आमंत्रण

1. चढ्या भावाने विक्री पंपावरून 106 रु. लिटरने घेतलेले पेट्रोल ग्रामीण भागात कॅनमधून 120 ते 130 रु. लिटरने विकले जाते.

2. साठेबाजी शेतपंप, लाकूड कटाई मशीन, वाळू उपशाच्या पंपांसाठी ड्रममध्ये साठा केला जातो. परवानगी नसताना शेकडो लिटरचा साठा घरात ठेवला जातो.

3. स्फोटाचा धोका उन्हाळ्यात प्लास्टिक कॅनमध्ये पेट्रोल ठेवल्यास वाफ व उष्णतेने स्फोट होऊन जीवितहानी होऊ शकते. मागील वर्षी शेजारच्या जिल्ह्यात कॅनचा स्फोट होऊन जण होरपळले होते.


आथिर्क तडजोडीमुळे कारवाई नाही’ का असा आरोप असा सामन्य नागरिकांकडून करण्यात येत आहे
‘एका कॅनमागे 10 रु. व ड्रममागे 100 रु. चिरीमिरी दिला की पुरवठा निरीक्षक व पोलीस डोळेझाक करतात. सीसीटीव्ही असूनही कारवाई होत नाही,’ असा थेट आरोप स्थानिकांनी केला आहे.जिल्हा पुरवठा अधिकारी कार्यालयाकडे तक्रारी करण्यास पुढाकार घेत नाहीत कारण धनदांडग्या लोकांच्या तक्रारी केल्यानंतर तक्रारदारांना धमकवण्यात येते असा आरोप पण नागरिकाकडून व्यक्त करण्यात येतो
मागील वर्षभरात तालुक्यात ड्रम-कॅन विक्रीची एकही कारवाई झालेली नाही.

कायदा काय सांगतो?

1. पेट्रोलियम कायदा 1934 परवाना नसताना पेट्रोल साठवणूक व विक्री केल्यास 3 महिने कारावास किंवा 1000 रु. दंड किंवा दोन्ही.

2. स्फोटक पदार्थ कायदा  नियमबाह्य साठ्यास 2 वर्षे कारावास व दंड.

3. आवश्यक वस्तू कायदा काळाबाजार केल्यास 7 वर्षांपर्यंत शिक्षा.

1. CCTV तपासणी सर्व पंपांचे मागील 15 दिवसांचे CCTV फुटेज तपासून कॅन-ड्रम विक्री करणाऱ्या पंपावर गुन्हे दाखल करा.

2. परवाना निलंबित करा वारंवार नियम मोडणाऱ्या पंपाचा विक्री परवाना 30 दिवसांसाठी निलंबित करा.

3. भरारी पथक नेमणूक पुरवठा, पोलीस व वजन-माप विभागाचे संयुक्त भरारी पथक नेमून अचानक तपासणी करा.

4. जनजागृती‘कॅनमध्ये पेट्रोल घातक’ याबत पंपावर मोठे फलक लावा व दंडात्मक कारवाईची माहिती द्या.

‘एखादी दुर्घटना घडल्यावर प्रशासनाला जाग येणार का?’ असा संतप्त सवाल नागरिक विचारत आहेत. जिल्हाधिकारी व जिल्हा पोलीस अधीक्षक यांनी तातडीने दखल घेऊन तालुक्यातील अवैध कॅन-ड्रम विक्री थांबवावी, अशी मागणी होत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker