अँड.बाळासाहेब आंबेडकर यांची 17 नोव्हेंबर ला नांदेड येथे जाहिर सभा…

New Bharat Times नेटवर्क
नांदेड :- नांदेड लोकसभा पोटनिवडणूक व जिल्ह्यातील नऊ विधानसभेच्या प्रचारार्थ नांदेड येथे भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे नातु वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा श्रद्धेय अँड.प्रकाश उर्फ बाळासाहेब आंबेडकर यांची नवा मोंढा मैदान नांदेड, येथे संध्याकाळी 5 वाजता जाहीर सभा होणार आहे. त्या सभेला सर्व वंचित घटकानी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहण्याचे आव्हान नांदेड वंचित बहुजन आघाडी चे नांदेड जिल्हाउपाध्यक्ष दिपक गजभारे यांनी केले आहे.
सध्या नांदेड लोकसभा पोटनिवडणूक व विधानसभा निवडणूक पार पडत आहे यामध्ये महाविकास आघाडी व महायुती यांच्या बरोबर वंचित बहुजन आघाडी ने जोरदार मुसंडी मारत या प्रचारात आघाडी घेतली आहे. नांदेड जिल्ह्यातील तीन जागेवर विजय निश्चित असल्याचा दावा वंचित ने केला आहे. तसेच इतर जागी आघाडी वर असल्याचे सांगण्यात येत आहे वंचित च्या धाडसी निर्णयामुळे महाविकास आघाडी व महायुती या उमेदवाराला धडकी भरल्यामुळे सैराभैरा होत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.
तर काही ठिकाणी पुर्ण ताकदीने ओबीसी समाज वंचित च्या मागे जरांगे फॅक्टर मुळे वंचित ला साथ देण्याकरिता जोर लावत आहेत. त्या अनुषंगाने अँड.प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर यांची सभा आयोजित केली आहे, त्यासाठी लाखोच्या संख्येने या ऐतिहासिक सभेत सामील व्हा आणि वंचित बहुजन आघाडीच्या सर्व उमेदवारांना प्रचंड बहुमताने विजयी करा, असे आव्हान केले जात आहे.