रवींद्र चव्हाण व डॉ.मिनल खतगावकरांना विजयी करण्याचा कुलेकडगी समाजाचा संकल्प
अंकुशकुमार देगावकर
नायगाव : लोकसभा पोटनिवडणूक व विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तालुक्यातील सुजलेगाव येथे कुलेकडगी समाजाचा मेळावा दि. १५ रोजी शुक्रवारी दुपारी पार पडला. यावेळी लोकसभेसाठी प्रा. रवींद्र चव्हाण यांच्या तर विधानसभेसाठी डॉ.मिनल खतगावकरासाठी समस्त समाज बांधवांनी एकजुटीने महाविकास आघडीच्या पाठीमागे राहण्याचा निर्धार करत दोन्ही उमेदवारांना प्रचंड मतांनी विजयी करण्याचा संकल्प केला.
नांदेड लोकसभेच्या पोटनिवडणुकीतील उमेदवार प्रा. रवींद्र चव्हाण व नायगाव विधानसभेच्या उमेदवार डॉ. मिनल खतगावकर यांच्या प्रचारासाठी नायगाव तालुक्यातील सुजलेगाव येथे कुलेकडगी समाजाचा शुक्रवारी मेळावा घेण्यात आला. या मेळाव्याच्या अध्यक्षस्थांनी श्रीनिवास चव्हाण तर प्रमुख उपस्थिती डि. मिनल खतगावकर, सेवानिवृत्त मुख्याध्यापक हनमंतराव खंडगावकर यांची प्रमुख उपस्थिती होती.
कुलेकडगी इतर मागासवर्गात मोडत असल्याने या समाजासाठी चव्हाण परिवार नायगावकर व खतगावकर हे नेहमीच मदतीसाठी आलेला असल्याने या लोकसभा पोटनिवडणुकीत आणि विधानसभा निवडणुकीत काँग्रेसच्या उमेदवारांना विजयी करण्यासाठी बळ द्यावे, आशिर्वाद द्यावा असे आवाहन डॉ. मिनल खतगावकर यांनी केले. या प्रसंगी मनोगत व्यक्त करतांना कुलेकडगी समाजाच्या प्रमुखांनी आम्ही तुमच्या पाठीशी असल्याचे यावेळी आवर्जून सांगितले. याप्रसंगी समस्त समाज बांधवांनी एकजुटीने महाविकास आघडीच्या पाठीमागे राहण्याचा निर्धार करत दोन्ही उमेदवारांना प्रचंड मतांनी विजयी करण्याचा संकल्प केला.
यावेळी हनमंतराव पाटील खंडगावकर, माजी पंचायत समिती सभापती आनंदराव शिवारेड्डी, कुलेकडगी समाज संघटनेचे माजी जिल्हाध्यक्ष आनंदराव आनंतवाड, माजी जिल्हा परिषद सदस्य आनंदराव येलमगोंडे, सुधाकर बकवाड, लक्ष्मण पाटील, शाहीर दिगू तुमवाड, हनुमंतराव पाटील आदमपूरकर, हनुमंतराव पाटील लुटके, दत्ता पाटील पांढरे, संतोष फुलकंटे, दत्तात्रय आईलवार सरपंच, सुधाकर संगेपवाड, किसनराव महाद्वाड, गोरखनाथ मुत्तेवाड, शिवराम पाटील, पांडुरंग जळणे, शिवाजीराव तोटावाड, हरी यलमगुंडे, किसनराव गुंडाळे, व्यंकटराव खदगावे, मधुकर पल्लेवाड, नागनाथ पाटील कुंटेवाड, शंकर पाटील दूडे.
वसंत पाटील, ज्ञानेश्वर जलकमोड,रामराव बेलापुरे, नागनाथ अनंतवाड, ऍड खुशालराव पाटील, प्रल्हाद तोडे, मारोतराव कुराडे, बालाजीराव उमाटे, गंगाधर पाटील, सदानंद पाटील, बाळू पाटील मुदखेडे, प्रकाश येरवाड, भगवानराव पाटील भंडारे, आनंदराव पाटील गागलेगावकर, साहेबराव शिंदे,माधव पाटील कदम, सज्जन संभाजी, गिरधर पाटील जीगळेकर, दीपक पाटील जिगळेकर, चंचलवाड, गजानन पाटील भोसले, पांडुरंग रामपुरे, रोडे गुरुजी यांच्यासह तिन्ही तालुक्यातील बहुसंख्या समाज बांधव उपस्थित होते.