कुंडलवाडीत सोसायटीतर्फे हमीभावाने सोयाबीन खरेदी केंद्राचे उदघाटन

कुंडलवाडी :- कुंडलवाडी विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी तर्फे कृषी उत्पन्न बाजार समिती यार्डातील सोसायटीच्या आडत दुकानात दि.२५ नोव्हेंबर रोजी सोयाबीन हमीभाव खरेदी केंद्राचे मान्यवरांच्या उपस्थितीत उदघाटन करण्यात आले.
भारतीय राष्ट्रीय उपभोक्ता सहकारी संघ मर्यादित महाराष्ट्र स्टेट को-ऑपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशन यांच्यातर्फे कुंडलवाडी येथील विविध सेवा सहकारी सोसायटीला सोयाबीन हमीभाव केंद्राची मान्यता मिळाली. त्यानुसार ५०० शेतकऱ्यांनी सोसायटी कार्यालयात सोयाबीन आणुन दिले आहेत. त्यापैकी ३५० शेतकऱ्यांचे ऑनलाईन नोंदणी करण्यात आली आहे.
उर्वरित शेतकऱ्यांची ही लवकरच नोंदणी करून सोयाबीन हमीभावानुसार खरेदी करण्यात येणार आहे. २५ नोव्हेंबर रोजी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या यार्डात असलेल्या सोसायटीच्या आडत दुकान परिसरात सोयाबीन हमीभाव खरेदी केंद्राचे सोसायटीचे चेअरमन सुनील बेजगमवार, सोसायटीचे माजी चेअरमन साईनाथ उत्तरवार, सोसायटीचे माजी संचालक संजय पाटील शेळगावकर, डॉ.मुकुंद बेलकर यांच्या उपस्थितीत उदघाटन करण्यात आले.
यावेळी व्हॉइस चेअरमन गंगाधर नरावाड, संचालक गंगाधरराव खेळगे, संचालक चक्रधर पाटील दिडशेरे, संचालक गणपत पाटील टेकाळे, संचालक नरेश सब्बनवार, माजी चेअरमन सयाराम नरावाड, माजी नगराध्यक्ष भूमन्ना ठक्कुरवार, माजी नगरसेवक श्रीनिवास जिठ्ठावार,माजी नगरसेवक गंगाप्रसाद गंगोणे, बालाजी पाटील जोगदंड, नामदेव पाटील दौलापुरकर, सत्यनारायण रत्नागिरे, ग्रेडर शिराढोणकर, श्रीकांत शिंदे, मँनेजर राम रत्नागिरे यांच्यासह अनेक सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसह नागरिकांची उपस्थित होती.
सोसायटीतर्फे सुरू करण्यात आलेल्या सोयाबीन हमीभाव खरेदी केंद्रात शहर व परिसरातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी सोयाबीन हमीभाव केंद्राचा लाभ घ्यावा, असे आवाहन सोसायटीचे चेअरमन सुनील बेजगमवार यांनी केले आहे.