येळी घाटातून अवैध वाळूचा उपसा करणारे 10 तराफि, चार इंजिन, दोन बोटी केल्या नष्ट

New Bharat Times नेटवर्क
लोहा : तालुक्यातील येळी येथील वाळू घाटातून बोटीच्या सहाय्याने अवैध वाळूचा उपसा करणाऱ्या बोटी तराफे स्फोटकाच्या सहा नष्ट करण्यात आली असून. सदरची कारवाई लोहा तहसीलदार परळीकर व उस्माननगर पोलीसांनी संयुक्तपणे केली आहे. यात जवळपास 25 लाखाचे साहित्य नष्ट करण्यात आले आहे.

जिल्हाधिकारी कार्यालयातील एका राजकीय वरदहस्त प्राप्त अधिकाऱ्याकडे गौण खनिज विभागाची सुत्रे आल्यापासून नांदेड जिल्ह्यात अवैध वाळू उपसा व चोरट्या मार्गाने मुरुमाचे उत्खनन करण्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. वरिष्ठ अधिकारीच कानाडोळा करत असल्याने तालुकास्तरीय अधिकारी वाहत्या गंगेत हात धुवून घेण्याचे काम करत असल्याने शासनाचा कोट्यवधी रुपयाचा महसूल बुडत आहे. अवैध वाळू उपस्याच्या बाबतीत ओरड झाली की थातूरमातूर कारवाई करण्यात येते आणि पुन्हा मागच्या दाराने हात मिळवणी केल्या जाते. सध्या जिल्ह्यात असाच प्रकार सुरु आहे.
लोहा तालुक्यातील उस्माननगरहद्दीत येळी येथील वाळू घाटावर बोटी,सक्षम पंप व तराफ्याच्या सहायाने अवैध वाळूचा उपसा होत असल्याची माहिती माहिती मिळाल्यानंतर लोहा तहसीलदार विठ्ठल परळीकर व उस्माननगर पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक चंद्रकांत पवार आणि गजानन गाडेकर महसूल व पोलीसांनी फौजफाट्यासह जावून येळी येथील वाळू घाटातून अवैध वाळूचा उपसा करणारे 10 तराफे, दोन बोटी व चार इंजिन असे 25 लाखाचे साहित्य स्फोटकाच्या सहाय्याने नष्ट करण्यात आले.
महसूल व पोलीस विभागाच्या वतीने संयुक्त कारवाई करण्यात आल्याचा देखावा करण्यात आला तरी वाळ माफीयांना मुक समंती देण्याचे काम महसूल विभाग व पोलीस यंत्रणेनेच आजपर्यंत केले आहे. छुपा पाठींबा होता त्यामुळेच दोन बोटी व चार इंजिनचा वापर करुन अवैध वाळू उपसा करण्यात येत होता. ज्या भागात अवैध वाळू उपसा करण्यात येत होता त्या भागात महसूल विभागाचा छुपा पाठींबा वाळू माफीयांना आजपर्यंत राहीलेला आहे.