नायगाव तालुक्यात अवैध रेती तस्करी जोमात : तहसीलदारांसह महसूल प्रशासन कोमात
प्रकाश महिपाळे
नायगाव : तालुक्यातील राहेर येथील नदीपात्रातून बोटींच्या साह्याने दिवसा व रात्रीच्या वेळेस हजारो ब्रास रेती तस्करी होत आहे. परंतु याकडे नायगाव तहसीलदारांसह महसूल प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याने कोट्यावधी रुपयांचा महसूल बुडत असल्याची चर्चा होत आहे.
नायगाव तालुक्यातील राहेर बरबडा परिसरातील गोदावरी नदीच्या पात्रातून रात्रंदिवस अवैध रेती उपसा सुरू आहे. त्यामुळे पर्यावरणाचा ऱ्हास तर होतच आहे परंतु शासनाचा कोट्यावधी रुपयांचा महसूल बुडत आहे. टाकळी, बरबडा, आंतरगाव येथे अवैध रेती उपसा केला जात असून याकडे मात्र स्थानिक तहसीलदार, महसूल विभागाचे मंडळ अधिकारी व तलाठी बघ्याची भूमिका घेत असल्याने त्यांचे रेती माफीयांसी लागेबांधे आहेत की काय असा प्रश्न निर्माण होत आहे.
गोदावरी नदी पात्रातून मशिनच्या सहायाने रेती माफिया राजरोसपणे अवैध रेती उपसा करीत आहेत. यामुळे स्थानिक महसूल यंत्रणा अस्तित्वात आहे की नाही ? की त्यांनी चिरीमिरी घेऊन साठे लोटे केले आहे ? असा प्रश्न निर्माण झाला आहे.
रेती माफिया, स्थानिक तहसीलदार, महसूल विभागाचे मंडळ अधिकारी व तलाठी यांचे हात ओले करून गंगेच्या पाण्यातून अवैध रेती उपसा केला जात आहे. याकडे जिल्हाधिकारी यांनी लक्ष द्यावे.