किनाळा येथे शेतीशाळा कार्यक्रम संपन्न
![](https://newbharattimes.in/wp-content/uploads/2024/12/IMG-20241220-WA0020-780x470.jpg)
मोरे मनोहर
किनाळा :- मौजे किनाळा तालुका बिलोली येथे शेतकऱ्यांना रब्बी हंगाम पिक मार्गदर्शन करण्यासाठी बिलोली कृषी विभाग आणि सांस्कृतिक संवर्धन मंडळ सगरोळी यांच्या संयुक्त विद्यमाने वतीने शेती शाळा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी आयोजित करण्यात आलेल्या शेती शाळा कार्यक्रमात हरभरा पीक एकात्मिक किड व रोग व्यवस्थापनाबाबत डॉ.कृष्णा अंभोरे सर किटक शास्त्रज्ञ कृषी विज्ञान केंद्र सगरोळी यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करताना हरभरा पीकावरील. विविध किडींच्या विशेषत घाटे अळी नुकसान अवस्था, किडीची ओळख, फेरोमन ट्रप वापर, रासायनिक पद्धतीने किड नियंत्रण तसेच मर रोग व्यवस्थापनाबाबत माहिती दिली. तसेच रब्बी हंगाम ईतर पिकाबद्दल मार्गदर्शन केले.
कृषी विभागाच्या विविध योजने बद्दल शेतकऱ्यांना श्री. एस एस तिडके तालुका कृषी अधिकारी बिलोली यांनी मार्गदर्शन केले. सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी श्री एम एस कुरुंद मंडळ कृषी अधिकारी बिलोली यांचे विशेष मार्गदर्शन लाभले हा कार्यक्रम घेण्यासाठी श्री अजय सावळे कृषी सहायक रामतीर्थ यांनी पुढाकार घेतला होता.
या कार्यक्रमास गावचे उपसरपंच बालाजी पाटील भोसले, माधव गोविंदराव पाटील भोसले, राजकुमार रावसाहेब पाटील मोहिते, बाबु मारोती माने, व्यंकटराव पाटील शेळगावे, बालाजी वाघमारे यासह गावातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन सांस्कृतिक संवर्धन मंडळ सगरोळी चे समन्वयक मारोती वड्डे यांनी
केले.