ताज्या बातम्यानांदेडमहाराष्ट्र

उमरी नगर पालिकेत स्ट्रीट लाईटच्या कामातही सावळा गोंधळ : प्रशासक राज असल्याने ओरबडून खाण्याची मोहीम

अंकुशकुमार देगावकर

उमरी : सामाजिक कार्यकर्ते संतोष गुंडाळे यांनी तक्रार करुन उमरी नगर पालिकेतील भ्रष्टाचाराची पोलखोल केल्यानंतर आता शहरात याच्या सुरस कथा चर्चिल्या जात असून. सहा कोटीच्या स्ट्रीट लाईटच्या कामाचाही सहा कोटीच्या कामाचाही बोजवारा उडविला आहे. इस्टीमेट मधील तरतुदी फाट्यावर मारुन स्ट्रीट लाईटच्या कामात संगणमताने भ्रष्टाचार करण्यात येत आहे.

यापूर्वी उमरी शहरात हायमाँस्टसह अनेक विद्यूत पोलची उभारणी करण्यात आलेली आहेत पण त्याततही अंदाजपत्रकात एक आणि प्रत्यक्षात दुसऱ्याच कंपणीचे पोल उभारण्यात आले असल्याचा प्रकार घडला आहे. पण नगर पालिकेत गुतेदाराची दादागिरी असल्याने याची कुणीच आणि कुठेही वाच्यता केली नाही कुणातही तशी धमक नसल्याचे आजपर्यंत दिसून आले. आजही तशीच परिस्थिती आहे कारण उमरी नगरपालिका अंदाजपत्रकात भरमसाठ तरतुदी ठेवून त्या तरतुदीनुसार काम न करता संगणमताने शासनाचा पैसा हडप करण्याची मोहीमच सुरु आहे.

उमरी शहरातील 8 प्रभागात स्ट्रीट लाईट बसवण्यासाठी वैशिष्ट्यपूर्ण योजनेतून सहा कोटी रुपये मंजूर करण्यात आले होते. यात दहा टक्के नगरपालिकेचा वाटा तर 90 टक्के शासन निधी देणार होते. त्यानुसार 60 लाख रुपये नगर पालिकेला देणे आवश्यक होते पण नागर पालिकेच्या कारभाऱ्यांनी 4 कोटी 91 लाख खर्चाची निविदा सप्टेंबर 2023 मध्ये काढली. निविदेनुसार कामही एका एजन्सीला मिळाले पण यातही बराच गोंधळ घातला असून या कामाच्या इस्टीमेट तरतुदी होत्या त्यानुसार काम न करता अतिशय सुमार दर्जाचे पोल उभ करण्यात येत आहेत.

प्रत्येक पोल उभे करण्यासाठी शासनाने ज्या गाईडलाईन ठरवून दिल्या आहेत त्यानुसार कामच होत नाही. थातूरमातूर काम करुन निधीत भ्रष्टाचार करण्याचा उद्योग सुरु आहे. पाच कोटीचे काम दोन ते आडीच कोटीत करण्यात येत असल्याची चर्चा उमरी शहरातील नागरिक करत आहेत. नागरिकांच्या सोईसाठी शासन कोट्यवधी रुपये देत असताना अधिकारी आणि गुतेदाराच्या संगणमताने कोट्यवधी रुपयाच्या शासकीय निधी घशात घालण्याची मोहीम उमरी नगर पालिकेत होत आहे.

उमरी नगर पालिकेवर कर्मयोगी दिवंगत बाबासाहेब गोरठेकर व माजी आमदार दिवंगत बापूसाहेब गोरठेकर यांनी एकहाती सत्ता चालवली पण निष्कलंक. त्यांनी त्यांच्या काळात सामाजिक समतोल सांभाळत भ्रष्टाचाराचा एकही डाग लागू दिला नाही. मात्र त्यांच्या नंतर नगर पालिकेत भ्रष्टाचाराचे इमले उभारल्या जात आहेत हे दुर्दैवी आहे.

उमरी शहराच्या विकासासाठी आजपर्यंत अनेक योजनेतून सन 2018 ते आजपर्यंत मिळालेल्या निधित कशाप्रकारे भ्रष्टाचार करण्यात आला याची पोलखोल करण्याचा निश्चय सामाजिक कार्यकर्ते संतोष गुंडाळे यांनी केला असल्याने अनेक घोटाळे उघड होण्याची शक्यता आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker