आला उन्हाळा, आरोग्य सांभाळा, उष्माघात टाळा – जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.संगीता देशमुख

New Bharat Times नेटवर्क
नांदेड :- सद्यस्थितीत नांदेड जिल्हात मार्चच्या मध्यावधी तापमानाचा पारा 38 अंशावर जात आहे. आगामी कालावधीत उष्माघाताचा घातक धोका वाढण्याची शक्यता आहे. आगामी पुढच्या एप्रिल व मे महिन्यात तापमान आणखी वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे उन्हाचा तडाखा वाढून उष्माघाताचा धोका वाढण्याची शक्यता आहे. भर दुपारी शेतातील व कष्टाची कामे टाळावी उष्माघाताचा त्रास जाणवल्यास तात्काळ उपचार घ्यावेत.
नागरीकांनी उष्माघात होऊ नये यासाठी आत्तापासूनच सजग राहावे असे आव्हान जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.संगीता देशमुख यांनी नागरीकांना केले आहे. उन्हाळ्यात शरीरातील पाण्याचे प्रमाण झपाट्याने कमी होते. त्यामुळे डीहायड्रेशन पाण्याची कमतरता होण्याचा धोका असतो. उन्हाळ्यात शरीर गार ठेवण्यासाठी आणि शरीरातील पाणी संतुलन ठेवण्यासाठी दिवसाला किमान आठ ते दहा ग्लास पाणी प्यावे गारसर पाणी किंवा माठातील पाणी पिल्याने शरीराला थंडावा मिळतो. खालील प्रमाणे खबरदारी घ्यावी.
ऊन टाळा आणि सावलीत राहा !
सकाळी 11 ते दुपारी चार या वेळेत उन्हात जाणे शक्यतो टाळावे कारण या वेळेत सूर्यप्रकाश सर्वाधिक तीव्र असतो जर बाहेर जाणे अत्यावश्यक असेल तर सन स्क्रीन लोशन लावावे डोळ्याचे संरक्षण करण्यासाठी सनग्लासेस वापरावे आणि शक्यतो छत्री सोबत ठेवावी कॉटनची दस्ती, कपडा त्याचा वापर करावा त्वचेची आणि केसाची काळजी घ्या.
उन्हामुळे त्वचा कोरडी पडते आणि सनबर्न होण्याचा धोका असतो त्यामुळे बाहेर जाताना सनस्क्रीन वापरणे आवश्यक आहे. त्वचेला हायड्रोट ठेवण्यासाठी उन्हामुळे अधिक नुकसान होऊ नये म्हणून स्कार्फ किंवा टोपी घालावी नारळ पाणी, लिंबू पाणी, ताक, फळाचे रस याचा समावेश आहारात करावा.
शीतपेय आणि जास्त साखर ! असलेले कोल्ड्रिंक्स टाळावे कारण त्यांनी शरीरातील पाण्याचे प्रमाण आणखी कमी होते असे ही जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.संगीता देशमुख यांनी नमूद केले आहे.
- उष्मघाताची लक्षणे •
सतत डोके दुखणे, गरगरणे किंवा चक्कर येणे, जास्त घाम येणे किंवा काही वेळाने घाम येणे बंद होणे, उलटी मळमळ, ताप किंवा अशक्तपणा, त्वरित सावलीत जावे आणि शरीर थंड करण्यासाठी ओल्या कपड्याने अंग पुसावे भरपूर पाणी प्यावे इलेक्ट्रोलाइट्स किंवा ओ.आर.एस घ्यावे. जर त्रास अधिक होत असेल तर ताबडतोब डॉक्टरचा सल्ला घ्यावा प्राथमिक आरोग्य केंद्र, आरोग्य उपकेंद्र यांच्याशी संपर्क करावा.
लहानमुलं आणि वृध्द यांची विशेष काळजी आवश्यक उन्हाळ्यात लहान मुले आणि वृद्ध व्यक्तींना विशेष काळजी घेणे आवश्यक असते कारण त्यांची प्रतिकारशक्ती तुलनेने कमी असते मुलांना वेळोवेळी पाणी आणि रसदार फळे घ्यावीत वृद्ध लोकांनी उन्हात फिरणे टाळावे आणि गरजेपेक्षा जास्त मेहनत करू नये. मुलांना उन्हात खेळू देताना टोपी डोक्यावर घालावी पुरेशा सावलीत खेळण्याची व्यवस्था करावी.
शरीर थंड ठेवण्यासाठी उपाय उन्हाळ्यात दिवसातून किमान दोन वेळा आंघोळ करावी. कोमट पाण्याने अंघोळ केल्यास शरीर ताजेतवाने राहते. पंखा, कुलर किंवा एसीचा योग्य वापर करावा पण गरम झालेल्या अवस्थेत लगेच थंड हवेत जाऊ नये घाम आल्यावर ताबडतोब थंड पाणी पिऊ नये कारण त्यामुळे सर्दी होण्याची शक्यता असते उष्माघाताची लक्षणे ओळखा आणि त्वरित उपाय करा.
हलका आणि पोषण युक्त आहार घ्या उन्हाळ्यात पचन संस्था थोडी मंदावते. त्यामुळे हलका आणि पचायला सोपा आहार घ्यावा हिरव्या भाज्या, फळे, कोशिंबीर आणि दूध यांचा समावेश असावा कलिंगड, खरबूज, संत्री मोसंबी यासारखी रसदार फळे खावी मसालेदार, तळलेले आणि जड अन्न शक्यतो टाळावे कारण ते पचायला वेळ लागतो आणि उष्णता वाढते उन्हाळ्यात आंबट पदार्थ आणि जास्त प्रमाणात मीठ असलेले पदार्थ खाणे टाळावे.
जिल्हा मधील सर्वीनी या प्रमाणे उपाय योजना करुन आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी. आला उन्हाळा, आरोग्य सांभाळा असे आव्हान जिल्हा परिषद नांदेडच्या जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.संगीता देशमुख यांनी आव्हान केले आहे.