रामतीर्थ येथील शेतकऱ्याची बैलजोडी चोरीला

मोरे मनोहर
किनाळा :- रामतीर्थ तालुका बिलोली येथील शेतकऱ्याची नांदेड देगलूर राज्य महामार्गावर असलेल्या शेतातील जागली वरून रामतीर्थ दि.15 मार्च रोजी पहाटेच्या सुमारास अज्ञात चोरांनी सुमारे 80 हजार किमतीची बैल जोडी चोरून नेल्याची घटना घडली असून रामतीर्थ पोलीस ठाण्यात या घटनेची नोंद करण्यात आली आहे.
रामतीर्थ येथील शेतकरी व्यंकटराव मारोती पाटील देगलुरे यांचे शेत नांदेड देगलुर राज्य महामार्गालगत शंकरनगर पासून जवळच असलेल्या शांताई पेट्रोल पंपाजवळ त्यांची शेतातच जागल असून ते नेहमी प्रमाणे आपल्या शेतात असलेल्या आकड्यावर सहा ते सात लहान मोठे जनावरे व बैल जोडी बांधलेली होती.
शंकरनगर पासून पाचशे मीटर अंतरावर नांदेड देगलूर राज्य महामार्गावर असलेला शेतातील आखाडा आणि बाजूलाच शांताई पेट्रोल पंप असलेल्या आखाड्यावरून 15 मार्च रविवारी पहाटेच्या सुमारास चोरट्याने सुमारे 80 हजार रुपये किमतीची एक बैलजोडी चोरुन नेली.
पहाटेच्या सुमारास पाण्याची मोटार चालू करण्यासाठी उठले असताना आखाड्यातील जनावर सुटले असलेले दिसले असता जनावरांना बांधण्यासाठी गेले असता त्यांना बैलजोडी दिसली नाही दोरी तोंडलेली दिसल्या ने त्याच वेळी सर्वत्र शोध चालू केला मात्र बैलजोडी कुठेही बैलजोडी दिसली नाही.
अज्ञात चोरट्याने बैलजोडी चोरून नेल्याचे लक्षात आल्यानंतर शेतकऱ्यांनी सर्वत्र शोधाशोध करून बैलजोडीचा शोध न लागल्याने शेतकऱ्यांनी अखेर रामतीर्थ पोलीस स्टेशन गाठून घडलेल्या घटनेची सविस्तर माहिती रामतीर्थ पोलिसांना दिली असता या घटनेची नोंद रामतीर्थ पोलीस ठाण्यात करण्यात आली असून या घटनेतील चोरांचा तपास केला जात आहे.
रामतीर्थ पोलीस ठाण्याच्या हद्दीत चोऱ्यांच्या प्रमाणात वाढ झाली असून राज्य महामार्गावर शंकरनगर येथे असलेले एसबीआय बँकेचे एटीएम अज्ञात चोरट्यांनी फोडले, ही घटना घडलेली असताना अवघ्या काही दिवसातच शंकरनगर जवळच वेगवेगळ्या दोन कंपनीच्या फायनान्स ऑफिसर अधिकाऱ्यांना राज्य महामार्गावर अडवून दोघांना चाकूचा धाक दाखवून लुटण्यात आले या घटनेचा तपास लागण्या अगोदरच आता शेतकऱ्यांच्या आखाड्यावरून बैल जोडी ही चोरून नेल्याने शंकर नगर परिसरातील नागरिकांत भीतीचे वातावरण पसरले असून रामतीर्थ पोलिसांनी रात्रीच्या वेळी पोलीस गस्त घालावे अशी मागणी सामान्य जनतेतून केल्या जात आहे.