तो ‘लाव्हारस’ नव्हे तर विज प्रवाह जमितीत उतरल्याने घडलेला प्रकार

प्रकाश माहिपाळे
नायगाव : रुई व इज्जतगाव शिवारातून एका विद्यूत पोलच्या बाजूला अचानक लाव्हारस सद्रश्य पदार्थ जमीनीवर दिसून आला. याची जिल्हाभर अफवा पसरल्याने भितीचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र ११ के.व्ही. च्या पोलला असलेल्या ताराच्या तणाव्यात विज प्रवाह उतरल्याने जमीनीतील दगड गोटे व माती जळून लाव्हारस सारखा पदार्थ जमीनीवर आला असल्याची माहिती कनिष्ठ अभियंता ज्ञानेश्वर जाधव यांनी दिली असून घडलेल्या प्रकाराची दुरुस्ती करण्यात आली असल्याचेही सांगितले.
नायगाव तालुक्यातील रुई (बु.) येथून इज्जतगावकडे ११ के.व्ही.ची लाईन गेली आहे. परंतु दि. १६ रोजी सकाळी इज्जतगाव रोडजवळ असलेल्या विजेच्या पोलच्या बाजूला लाव्हारस सद्रश्य पदार्थ जमीनीवर दिसून आला. त्यामुळे बघणाऱ्यांची चांगलीच गर्दी झाली व लाव्हारस जमीनीवर आला असल्याची जिल्हाभर अफवा पसरली. यामुळे भितीचे वातावरण निर्माण झाले होते.
त्याचबरोबर काहींनी याची माहिती विज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांना दिली. सदरची माहिती मिळाल्यानंतर कुष्णूर येथील अधिकारी घटनास्थळी जावून पाहणी केली असता ते ही अगोदर चक्रावून गेले पण पोलवरील विजेचा प्रवाह पोलच्या तारेच्या तणाव्यात उतरला असल्याचे दिसून आले.
सदरचा भाग खडकाळ असल्याने जमीनीतून आरतींग मिळाली नाही त्यामुळे तारेच्या तणाव्याच्या बुडात असलेल्या दगड, माती व गोटे वितळल्यामुळे लाव्हारस सद्रश्य पदार्थ जमीनीवर आला त्यामुळे जनतेत भितीचे वातावरण निर्माण झाले होते. विज वितरण कंपनीच्या अधिकांनी याची दुरुस्ती केली पण ११ के.व्ही. विद्यूत वाहीणीच्या जवळ कुणी गेल्यास अनर्थ घडला असता पण तातडीने दुरुस्ती करण्यात आल्याने पुढील अनर्थ टळला.
हाय होल्टेज ११ के.व्ही चा विज पुरवठा जमिनीत उतरल्याने हिट निर्माण झाली आणि तारेच्या ताव्यासाठीच्या खड्यात टाकलेले साहित्य वितळून गेले व नंतर ते जमीनीवर आले. भितु बाळगण्यासारखे काहीही नाही.
ज्ञानेश्वर जाधव, कनिष्ठ अभियंता, विज वितरण कंपनी.