गावाकडच्या बातम्याबिलोलीमहाराष्ट्र

कुंडलवाडी शहरात आयप्पा स्वामी माळधारण कार्यक्रम संपन्न◆५७ भक्तांनी माळधारण केले

कुंडलवाडी : – शहरातील श्री विठ्ठल साई मंदिरात दरवर्षी प्रमाणे यावर्षीही आयप्पा स्वामी माळधारण कार्यक्रम दि.२५ नोव्हेंबर रोजी संपन्न झाले. यात शहरातील ५७ भक्तांनी माळधारण केले आहे.

कुंडलवाडी शहरात मोठ्या प्रमाणात आयप्पा स्वामी भक्त माळधारण करतात. त्यातच यावर्षी ५७ भक्तांनी माळधारण केले आहे. दि.२५ नोव्हेंबर ते २८ नोव्हेंबर दरम्यान शहरातील श्री विठ्ठल साई मंदिरात पहाटे सुर्यादयापुर्वी आयप्पा स्वामी यांची पुजा करून माळधारण कार्यक्रम संपन्न झाला.यात ४१ दिवस आयप्पा स्वामी यांची सकाळ व संध्याकाळ पुजा करून माळधारण केलेले सर्व भक्त मकरसंक्रांतीच्या दिवशी केरळमधील शबरीमाला येथे आयप्पा स्वामीच्या दर्शनासाठी उपस्थित राहतात.

शहरात २००३ वर्षी पासून कुंडलवाडी येथे श्री अय्यप्पा स्वामी चे माळ धारण कार्यक्रम चालू आहे विशेष म्हणजे श्री यु रमणाप्रसाद गुरुस्वामी यांच्या मार्गदर्शनाखाली बरेच जण अय्यप्पा स्वामी चे माळ धारण करून व्यसनमुक्त होत आहेत. या माळधारण कालावधी असलेल्या ४१ दिवसात आयप्पा स्वामी पालखी मिरवणूक शहरात काढली जाते.तसेच महापडी पुजा हे कार्यक्रम होतात. ४१ दिवसाच्या दिनचर्येत पहाटे ४ वाजता उठणे व सुर्यादयापुर्वी आयप्पा स्वामींची पुजा करणे,दुपारी एक वेळेसच जेवन,सांयकाळी अल्पोपहार आणि रात्री सुर्यास्तानंतर पुजा असा दिवसभराचा कार्यक्रम आहे.

आयप्पा स्वामी माळधारण मुळे शहरात ४१ दिवस भक्तीमय वातावरण असते व दर बुधवार व शनिवार पहाटे साडेचार वाजता श्री अय्यप्पा स्वामी ची महा अभिषेक केले जाते. या अभिषेकासाठी फार मोठे संख्येने भक्तगण उपस्थित असतात. ४१ दिवसाच्या माळधारण केल्यानंतर कुंडलवाडीचे आराध्य दैवत श्री कुंडलेश्वर मंदिर येथे इरुमुडी कार्यक्रम संपन्न होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker