ताज्या बातम्यानांदेडनायगांव

नायगाव तालुका ग्रामपंचायत अधिकारी संघटनेतर्फे गटविकास अधिकारी एल आर वाजे यांना निरोप… व गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

New Bharat Times नेटवर्क

नायगांव :- माझ्या कार्यकाळात ग्रामपंचायत पातळीवरील अनेक विकास कामे व वैयक्तिक लाभात मोडणाऱ्या घरकुल योजना मी निश्चय केला होता त्याही पेक्षा अधिक प्रमाणात लाभार्थ्यांना त्याचा लाभ मिळाला. तर तालुक्यातुन येणाऱ्या तक्रारीचे निरंसन करण्यासाठी मला स्थानिक पातळीवरील ग्रामपंचायत अधिकारी यांच्यासह सर्वच वरिष्ठ कर्मचाऱ्यांनी साथ दिली. त्यामुळे मी तक्रारीचा निपटारा करण्यात सफल झालो. प्रशासन म्हणले की अडचणी येतात परंतु तालुक्याचा गाडा हाकण्यासाठी सर्वांचे प्रयत्न महत्त्वाचे आहेत असे प्रतिपादन गटविकास अधिकारी एल आर वांजे यांनी केले.

नायगांव पंचायत समितीचे गटविकास अधिकारी एल आर वाजे यांची बदली धाराशिव जिल्ह्यातील भूम येथे झाली. तर येथे नव्याने संजय मिरजकर यांनी पदभार स्वीकारला. जाणाऱ्यांना निरोप तर येणाऱ्याचे स्वागत व ग्रामसेवकांच्या गुणवंत पाल्याचा सत्कार सोहळा ग्रामपंचायत अधिकारी संघटनेच्या वतीने दि २ जुलै रोजी येथील सभागृहात मोठ्या उत्साहात पार पडला. या सोहळ्याला व्यासपीठावर उमरीचे गटविकास अधिकारी तोटावाड, श्रीनिवास पाटील चव्हाण, भाजपाचे तालुकाध्यक्ष श्रीहरी देशमुख नरंगलकर, उपविभागीय अंभियंता डी आय होनराव, विस्तार अधिकारी प्रकाश जाधव, गणेश टोनगे, कृषी अधिकारी जोधळे, कक्ष अधिकारी सिनगिकर, महेश मुखेडकर, सेवानिवृत्त विस्तार अधिकारी शामसुंदर शिंदे, बदलीवर गेलेले विस्तार अधिकारी जी. बी.कानोडे, शाखा अभियंता गोणेवार, सहाय्यक अभियंता मयुर जिरवणकर, ग्रामपंचायत अधिकारी संघटनेचे तालुकाध्यक्ष टी जी पाटील रातोळीकर आदी मान्यवर उपस्थित होते.

पुढे बोलताना एल.आर. वाजे म्हणाले की, नायगांव तालुक्याचा नाव वेगळ्या पद्धतीने घेतल्या जात होता. परंतु माझ्या कार्यकाळात काम करताना मला तसा कोणताही अनुभव आला नाही. काम करणाऱ्याला खूप काही सोपं असतं परंतु काही जण काम न करता फक्त वेळ वाया घालण्याचे काम करतात त्यांना हा तालुका जड जातो. मी प्रशासनाचे काम करत असताना सर्वांना सोबत घेऊन काम केल्यामुळे मला कोणतीही अडचण निर्माण झाली नाही. पत्रकार मित्रांचेही मला माझ्या कार्यकाळात खूप सहकार्य मिळाले असे मत आपल्या मनोगतातून व्यक्त केले. याप्रसंगी व्यासपीठावरील सर्वांनीही बदलून गेलेले वाजे आणि आलेले मिरजकर या दोघांबद्दलही आपले मत व्यक्त केले.

यावेळी ग्रामपंचायत अधिकारी संघटनेचे अध्यक्ष टि.जी.पाटील रातोळीकर, सचिव सुर्यकांत बोंडले, प्रल्हाद गोरे, दिलीप खैरनार, धनराज केते, नागेश यरसनवार, साईनाथ पा.चव्हाण, अशोक कदम, मिलिंद जोंधळे, संदीप मोरे, निलेश कुलकर्णी, राजू मद्देवाड, विठ्ठल कानगुले, नागोराव सूर्यवंशी, यादव सूर्यवंशी, गजानन इबिते, जगन्नाथ गोरलावाड, विश्वाभर यरपलवाड, नामदेव माने, रेडेवाड, बाजीराव रोडेवाड, विनोद झुंजूरे, हणमंत शिंदे, विठ्ठल वडजे, श्रीनिवास संगेवार, मनीष पेनेवार, शारदा भांजे, विद्या मोरे, अपर्णा बीजेवार, अलका मुगटकर, सुजाता शिंदे, सुप्रिया घाटे.

गुट्टे मॅडम, गिरी मॅडम, हर्षा लाडके, गोरखवाड मॅडम, विजया शिंदे, मिमपुलवार मॅडम, विनायक कोंडावर, संदीप पुरजवर, डि एल वाघमारे, सदाशिव आगलावे, शरद लाडेकर के. एन. बोधले, कनिष्ठ अभियंता प्रमोद पाटील, सहाय्यक कनिष्ठ अभियंता व्ही सी गायकवाड, मारोती पा.कदम सोमठाणकर, शिवाजी पा.पळसगांवकर , ठाकुर , अर्जुन वजीरे , हानमंतराव मिरकुटे, दशरथ इरेवाड, माधव पवार, संजय पा.चोंडे, शिवराज वरवटे, भगवान ढगे यांच्या सह अनेक जणांची उपस्थिती होती. ग्रामसेवक संघटनेने घेतलेल्या या कार्यक्रमाचे कौतुक करण्यात आले.

तीन वर्ष गटविकास अधिकार एल.आर वाजे यांनी नायगांव तालुक्यात चांगले काम केले. गोरगरीब जनतेची चांगल्या प्रकारे सेवा करून नाव लौकीक करून घेतले. कर्मचा-यासह जनतेलाही वाजे साहेबाबद्दल आदर वाटत होता. घरकुल योजना सर्वेक्षणात नायगांव मतदार संघात ग्रामपंचायत अधिकारी, गटविकास अधिकारी, विस्तार अधिकारी यांनी चांगले काम केले. तालुक्यात ग्रामपंचायत अधिकारी चांगल्या पध्दतीने जनतेची सेवा करतात. गटविकास अधिकारी वाजे यांच्या काळात सिंचन विहीर, जनावराचे गोठे, घरकुलचा लाभ शेवटच्या घटकांपर्यंत पोहचविण्याचे काम केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker