बिलोली आगारातून लांब पल्याच्या बसेस सुरू करा ; श्री.भक्ती गणेश मंडळाच्या पदाधिकाऱ्यांचे बिलोली आगार प्रमुखांना निवेदन

New Bharat Times नेटवर्क
कुंडलवाडी :- कुंडलवाडी शहर व परिसरातील नागरिकांच्या सोयीसाठी बिलोली आगारातून लांब पल्ल्याच्या बसेस सोडण्यात यावे अशा मागणीचे निवेदन कुंडलवाडी येथील श्री भक्ती गणेश मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी दि. १६ जानेवारी रोजी बिलोली आगारप्रमुख नरसिंग निम्मनवाड यांना दिले आहे.
कुंडलवाडी शहरात प्रत्येक समाजकार्यात अग्रेसर असलेले श्री भक्ती गणेश मंडळांनी शहर व परिसरातील नागरिकांच्या प्रवाशांच्या सोयीसाठी बिलोली आगारात लांब पल्ल्याच्या एसटी बसेस सुरू करण्याबाबत निवेदन दिले आहे. यात कुंडलवाडी – माहूर हि बस यापूर्वी सुरू होती. ती सुरू करून भोकर, हदगाव, उमरखेड, माहुर आर्णी मार्ग यवतमाळ पर्यंत सोडण्यात यावे, कुंडलवाडी ते भैसा निर्मल अदिलाबाद गडचांदूर या मार्गाने चंद्रपुर पर्यंत बस सुरु करण्यात यावे.
कुंडलवाडी ते भैसा-निर्मल-अदिलाबाद मार्गाने नागपूर बस सुरू करण्यात यावे, दक्षिण हिंदुस्थानातील प्रसिद्ध असलेले तीर्थक्षेत्र बासर मार्गे कुंडलवाडी ते निजामाबाद बस सुरू करण्यात यावे, कुंडलवाडी ते धर्माबाद-बासर-निझामाबाद मार्गे हैद्राबाद बस सुरू करण्यात यावे सुरु करण्यात यावे, धर्माबाद ते लातुर बस बिलोली-मुखेड शिरुर ताजबंद लातूर पर्यंत बससेवा २६ जानेवारी २०२६ पर्यंत सुरु करण्यात यावे अशा मागणीचे निवेदन श्री भक्ती गणेश मंडळाचे अध्यक्ष राजेश कळसाईत व मंडळाच्या सर्व पदाधिकारी, सदस्यांनी बिलोली आगार प्रमुख यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.



