नगरपरिषदेच्या वतीने घरघर संविधान वाटप करणार – मुख्याधिकारी – निलम कांबळे
New Bharat Times नेटवर्क
उमरी : नगरपरिषद उमरी यांच्यामार्फत संविधान अमृत महोत्सव अंतर्गत सन 2024-25 पासून ‘घर घर संविधान कार्यक्रम ‘ साजरा करण्यात येणारं असल्याची माहिती उमरी नगरपरिषदेचे मुख्याधिकारी निलम कांबळे यांनी दिले.
संविधान वाटपाचे औचित्य साधून दिनांक 21 जानेवारी 2025 रोजी सकाळी 11 वाजता विद्यार्थिनी व महिलांकरिता भारतीय राज्यघटनेवर, प्रजासत्ताक दिनावर, भारतीय स्वातंत्र्यलढ्यावर आधारित रांगोळी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
या विजयी स्पर्धकांना प्रथम पारितोषिक 2100 रुपये रोख, तर द्वितीय पारितोषिक 1100 रुपये रोख, तसेच तृतीय पारितोषिक 500 रुपये रोख असे बक्षीस ठेवण्यात आलेले आहे तरी जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी ,महिलांनी या स्पर्धकांनी यात सहभाग नोंदवावा व स्पर्धकांनी आपल्या नावाची नोंद नगरपरिषद कार्यालयात करावी, असे आवाहन मुख्याधिकारी नीलम कांबळे यांच्यावतीने करण्यात आलेले आहे.