नांदेड जिल्ह्यातील ४९ परीक्षा केंद्रावर उद्या नवोदय सहावीसाठी निवडचाचणी परीक्षा
मोरे मनोहर
किनाळा :- नांदेड जिल्ह्यातील शंकरनगर तालुका बिलोली येथील जवाहर नवोदय विद्यालयात इयत्ता सहाव्या वर्गात प्रवेशासाठी घेण्यात येणारी निवड चाचणी परीक्षा उध्या दिनांक 18 जानेवारी रोजी जिल्ह्यातील ४९ परीक्षा केंद्रावर घेण्यात येणार असून या निवड चाचणी परीक्षेसाठी जिल्ह्यातून 16255 विद्यार्थी परीक्षेसाठी पात्र असल्याचे जवाहर नवोदय विद्यालयाचे प्राचार्य सुहास मांडले यांनी सांगितले आहे.
राजीव गांधी यांच्या संकल्पनेतून केंद्र सरकारच्या माध्यमातून प्रत्येक जिल्ह्यात एक नवोदय विद्यालय सुरू करून या विद्यालयात होतकरू व हुशार सर्व सामान्य कुटुंबातील विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळावे यासाठी अशा नवोदयची स्थापना करून या विद्यालयात इयत्ता पाचवीत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांची निवड चाचणी प्रवेश परीक्षा घेऊन या परीक्षेत उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना इयत्ता सहाव्या वर्गासाठी प्रवेश दिला जातो.
शंकरनगर तालुका बिलोली जिल्हा नांदेड येथे असलेल्या जवाहर नवोदय विद्यालयात इयत्ता सहावी वर्गात प्रवेशासाठी www.navodaya.gov.in या संकेतस्थळावर इयत्ता पाचवीत शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांनी ऑनलाइन निवड चाचणी परीक्षेचा फॉर्म भरावे असे आव्हान प्राचार्य सुहास मांडले यांनी केले होते त्यानुसार जिल्ह्यातील सुमारे 16255 विद्यार्थ्यांनी ऑनलाइन अर्ज भरले असून यासाठी नांदेड जिल्ह्यातील चालू शैक्षणिक वर्ष 2024-25 मध्ये वर्ग पाचवी वर्गात शिक्षण घेत असलेल्या जिल्ह्यातील विविध शाळेतील विद्यार्थी इयत्ता सहावी प्रवेश निवड चाचणी परीक्षेसाठी पात्र असून ही परीक्षा जिल्हाधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली उध्या दिनांक 18 जानेवारी रोजी जिल्ह्यातील विविध ठिक ठिकाणी 49 परीक्षा केंद्रावर ही परीक्षा घेतली जाणार असुन प्राचार्य श्री सुहास मांडले यांच्या मार्गदर्शनाखाली विष्णू यादव हे परीक्षा प्रमुख म्हणून काम पाहत आहेत.